7 May 2025 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

Inox Wind Share Price | कंपनी ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, मालामाल करणार शेअर, यापूर्वी दिला 220% परतावा

Inox Wind Share Price

Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला 201 मेगावॅट क्षमतेचे उपकरणे पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट कंपनीला इंटिग्रम एनर्जीकडून मिळाला आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )

मंगळवारी आयनॉक्स विंड स्टॉक 171.70 रुपये किमतीवर ओपन झाला होता. दिवसभरात या कंपनीने 179.40 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. त्यानंतर हा स्टॉक 2.32 टक्क्यांच्या घसरणीसह 166.35 रुपये किमतीवर क्लोज झाला. आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 1.94 टक्के वाढीसह 175.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयनॉक्स विंड कंपनी औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याचा व्यवसाय करते. तसेच ही कंपनी प्रकल्प व्यवस्थापन आणि मालमत्ता व्यवस्थापन सेवा देखील प्रदान करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना 3 मल्टीलेअर ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सेवा प्रदान करते. आयनॉक्स विंड कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 2.5 GW आहे. या वर्षी मे महिन्यात कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीमध्ये 900 कोटी रुपये भांडवली गुंतवणुक केली होती. या निधीनंतर कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली होती.

मागील 12 महिन्यांत आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात आयनॉक्स विंड स्टॉक 28 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 190 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 46.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21,662.54 कोटी रुपये होते. प्रवर्तकांनी आयनॉक्स विंड कंपनीचे एकूण 48.27 टक्के भागभांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 28.49 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 13.37 टक्के भागभांडवल धारण केले आहे. तर म्युच्युअल फंडानी या कंपनीचे 7.75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inox Wind Share Price NSE Live 09 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Inox Wind Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या