1 May 2025 9:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, अपडेट आली, मालामाल करणार शेअर - Marathi News

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारी फोकसमध्ये आले होते. नुकताच या कंपनीने (NSE: JIOFINANCE) सेबी मान्यतेच्या अधीन राहून गुंतवणूक सल्लागार सेवा देण्यासाठी BlackRock Advisors सिंगापूर कंपनीसोबत एक संयुक्त उपक्रम कंपनी स्थापन केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने माहिती दिली की त्यांनी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या 30,00,000 इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सबस्क्रिप्शनसाठी 3 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून 7 सप्टेंबर रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीला निगमन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 3.06 टक्के वाढीसह 352.15 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने या नवीन JV कंपनीचे नाव ‘Jio BlackRock Investment Advisers Private Limited’ असे ठेवले आहे.

मागील तीन महिन्यांत बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 3.6 टक्क्यांनी घसरला आहे. YTD आधारे सेन्सेक्स 12.3 टक्क्यांनी वाढला आहे. त्या तुलनेत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉकमध्ये 44 टक्क्याची वाढ झाली आहे. जुलै 2024 मध्ये RBI ने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीला NBFC मधून मुख्य गुंतवणूक कंपनीमध्ये रूपांतरित करण्यास परवानगी दिली होती.

JFS ही एक होल्डिंग कंपनी असून ती जिओ फायनान्स लिमिटेड, Jio Insurance Broking Limited, Jio Payment Solutions Limited, Jio Payments Bank Limited या संयुक्त उपक्रमांद्वारे आपला वित्तीय सेवा व्यवसाय चालवते. या कंपनीची स्थापना कंपनी कायदा 1956 अंतर्गत 22 जुलै 1999 रोजी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने झाली होती.

नंतर या कंपनीचे नाव बदलून रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड असे करण्यात आले होते. आणि 14 जानेवारी 2002 रोजी या कंपनीला नव्याने इन्कॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र जारी करून कंपनीचे नाव ‘Jio Financial Services Limited’ असे करण्यात आले होते. 25 जुलै 2023 रोजी या कंपनीला नव्याने प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 10 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या