3 May 2025 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Salary Advance Loan | फार कमी लोकांना माहित आहे सॅलरी ऍडव्हान्स लोन, सणासुदीत नोकरदारांसाठी फायद्याचा पर्याय- Marathi News

Highlights:

  • Salary Advance Loan
  • काय आहे सॅलरी ऍडव्हान्स लोन :
  • लोन, व्याज आणि इतर नियम :
  • झटपट मिळवू शकता सॅलरी लोन :
Salary Advance Loan

Salary Advance Loan | नोकरदारांसाठी प्रत्येक महिन्याचा पगार येणे हे एका स्वप्नासारखेच असते. पगार आल्याबरोबर 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत महिना चालवायचा असतो. परंतु पगार हातात आल्याबरोबर किराणा, गॅस, लाईट बिल, मुलांच्या शाळेची फी, मेंटेनेस, टॅक्स या सर्व गोष्टींमुळे 30 तारखेपर्यंत चालणारे पैसे 10 किंवा 15 तारखेला असं संपून जातात. आता पगारामध्ये केवळ याच गोष्टी नाही तर, सणवार, आला-गेला देखील पहावं लागतं. अशावेळी आपल्याकडे जास्तीचे पैसे कुठून येणार असा प्रश्न प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीला पडतो.

जास्तीचे पैसे तुम्हाला कोणत्याही वेळी लागू शकतात. अशावेळी काहीजण दुसऱ्यांकडून उधारीवर पैसे घेणे पसंत करतात. परंतु ही उधारी देखील पुढच्या महिन्याच्या देयीमध्ये नमूद होते. म्हणजेच पुढच्या महिन्यात पगार आल्याबरोबर उधारी आपल्याला चुकती करावी लागते. तुम्हाला गरजेकाळी चटकन पैसे प्राप्त करता यावे यासाठी सॅलरी ॲडव्हान्स लोन नावाचं एक लोन बँकेकडून देण्यात येतं. या लोनविषयी फार कमी व्यक्तींना माहित आहे

काय आहे सॅलरी ऍडव्हान्स लोन :
नोकरीपेशा असणारा कोणताही व्यक्ती सॅलरी ऍडव्हान्स लोन घेण्यासाठी पात्र आहे. तसं पाहायला गेलं तर, पर्सनल लोन ऐवजी सॅलरी लोनवर व्याजाची गणना मंथली किंवा डेली बेसिसवर केली जाते. त्याचबरोबर प्रत्येक बँकेत या लोनसाठी इंटरेस्ट रेट आणि नियम वेगवेगळे असू शकतात. अनेकजण या सॅलरी ऍडव्हान्स लोनचा फायदा घेताना पाहायला मिळत आहेत.

लोन, व्याज आणि इतर नियम :
बँक बाजार या वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार लोन टॅप, अर्ली सॅलरी, क्विक क्रेडिट, कॅशकुमार, फ्लेक्स सॅलरी आणि क्रेडिट बाजार या सर्व महत्त्वाच्या फायनान्शिअल फर्म आहेत. ज्यांच्याद्वारे ऍडव्हान्स लोन ऑफर केले जाते.

झटपट मिळवू शकता सॅलरी लोन :
सॅलरी लोन मिळवण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. ऑनलाइन पद्धतीने तुम्ही सॅलरी ऍडव्हान्स लोन प्राप्त करू शकता. समजा तुम्ही एखाद्या संकटामध्ये फसला आहात आणि तुम्हाला पैशांची नितांत गरज आहे. अशावेळी तुम्ही ऍडव्हान्स सॅलरी लोनसाठी अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला झटपट लोन प्राप्त करता येईल. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन आणि फायनान्स कंपन्या कर्मचाऱ्यांना वेळे प्रसंगी त्वरित लोन प्राप्त करून देण्यासाठी सज्ज असतात. हे लोन तुम्ही सॅलरी ऍडव्हान्स लोनच्या स्वरूपात प्राप्त करू शकता.

Latest Marathi News | Salary Advance Loan 07 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Salary Advance Loan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या