2 May 2025 8:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Vedanta Share Price | जबरदस्त कमाई होणार, वेदांता कंपनीबाबत अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • Vedanta Share PriceNSE: VEDL – वेदांता लिमिटेड कंपनी अंश
  • शेअरची सध्याची स्थिती
  • वेदांता लिमिटेड – बिझनेस अपडेट
  • वेदांता लाभांश 2024
  • वेदांता शेअर – टार्गेट प्राईस
Vedanta Share Price

Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीबाबत नव्याने आलेल्या अपडेटनंतर हा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. या बिझनेस अपडेटनंतर शेअर बाजार तज्ज्ञांनी देखील या शेअरवर (NSE: VEDL) सरकात्मक सल्ला दिला आहे. वेदांता लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीसाठी जाहीर केलेल्या बिझनेस अपडेटमुळे स्टॉक मार्केट एक्सपर्टस वेदांता शेअरवर उत्साही असल्याचे आकडेवारी सांगते आहे. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचा शेअर 0.50 टक्के घसरून 497.80 रुपयांवर बंद झाला आहे. एकाच वेळी जवळपास ३५.२५ लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सचे ट्रेड झाले असं आकडेवारी सांगते आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.27 टक्के घसरून 496.10 रुपयांवर ट्रेड करत होता.

वेदांता लिमिटेड – बिझनेस अपडेट
वेदांता लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत लोहखनिज, जस्त आणि ॲल्युमिनियमच्या उत्पादनात वाढ नोंदविली आहे. मात्र, दुसरीकडे याच तिमाही आकडेवारीनुसार पोलाद, खाण धातू आणि तेल व वायूचे उत्पादन घटले असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेदांताने बीएसईला दिलेल्या फायलिंगमध्ये नमूद केले आहे की, दुसऱ्या तिमाहीत ॲल्युमिनियमचे उत्पादन मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास ३ टक्क्यांनी वाढून ६,०९,००० टन झाले आहे.

वेदांता लिमिटेड कंपनीने फायलिंगमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, झिंक इंडियामध्ये विक्रीयोग्य धातूचे उत्पादन २,४१,००० टनांवरून २,६२,००० टनांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे, वायू आणि तेलाचे उत्पादन एकूण २२% घटून १,०४,९०० बोईपीडी झाले आहे, आणि ही आकडेवारी मागील वर्षीच्या १,३४,१०० बोईपीडीवरून तिमाहीत सरासरी दैनंदिन सकल ऑपरेटिंग उत्पादना इतकी आहे असं आकडेवारी सांगते.

वेदांता लाभांश 2024
वेदांता लिमिटेड कंपनी ही शेअर बाजारात डिव्हिडंड किंग म्हणून ओळखली जाते. वेदांता लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला 25 सप्टेंबर रोजी फायलिंग मध्ये नमूद केलं आहे की, 8 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी इक्विटी शेअर्सवरील चौथ्या अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. वेदांता लिमिटेड कंपनीने पुढील कॉर्पोरेट कारवाईसाठी १६ ऑक्टोबर २०२४ ही एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेट असल्याचे जाहीर केले आहे.

वेदांता शेअर – टार्गेट प्राईस
प्रसिद्ध आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ६०० रुपयांच्या टार्गेट प्राईस सह BUY रेटिंग जाहीर केली आहे. त्यामुळे हा शेअर आगामी काळात मालामाल करू शकतो असं BUY रेटिंग देताना म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vedanta Share Price 09 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या