3 May 2025 6:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

Smart Investment | कमी वयातच बचतीची सवय लावा; 15 वर्षांत करोडपती होण्याचे सूत्र जाणून घ्या, फायदा होईल - Marathi News

Smart Investment

Smart Investment | ज्या व्यक्तींचा महिन्याचा पगार चांगला असतो त्यांना बचतीचे आणि पैसे गुंतवणुकीचे चांगले मार्ग ठाऊक असतात. पगार चांगला असेल तर आपल्याला जास्तीत जास्त पैशांची गुंतवणूक करता येते.

सध्याच्या घडीला म्युच्युअल फंड आणि SIP या अशा योजना आहेत. ज्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीवर 12% परतावा दिला जात आहे. हा परतावा जास्त असून इतर कोणत्याही गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये एवढं जास्तीचा परतावा मिळत नाही. तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर लक्षाधीश व्हायचं असेल तर तुम्हाला वयाच्या 25 व्या वर्षापासूनच गुंतवून करून भविष्य सेट करावं लागणारं आहे. तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचं असेल तर, जाणून घ्या हे फायद्याचे सूत्र.

गुंतवणुकीचे सूत्र :
12-15-20 हे सूत्र तुम्हाला लवकरात लवकर करोडपती करण्यास मदत करेल. या सूत्राचा अर्थ असा आहे की, 12 म्हणजेच मिळणारा 12% परतावा, 15 म्हणजे एकूण 15 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक आणि 20 म्हणजे प्रत्येक महिन्याला गुंतवली जाणारी रक्कम 20,000. एखाद्या तरुणांने त्याच्या 25 व्या वर्षापासून 20,000 हजारांची SIP सुरू केली आणि गुंतवणुकीचे सातत्य 15 वर्षांपर्यंत सुरू ठेवते तर, 40 व्या वर्षी 12% परताव्यासह करोडपती देखील बनू शकाल.

कॅल्क्युलेशन समजून घ्या :
तुम्ही SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात प्रत्येक महिन्याला 20 हजारांची रक्कम गुंतवत असाल तर 15 वर्षांच्या गुंतवणुकीवर 36,00,000 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा होते. एसआयपी कॅल्क्युलेटरप्रमाणे 12% व्याजदरानुसार व्याजाची रक्कम 64,91,520 एवढं असेल. म्हणजेच 15 वर्षानंतर तुमच्या खात्यात 1,00,91,520 एवढी रक्कम जमा होईल. SIP ही मार्केटशी निगडित गुंतवणूक योजना असल्यामुळे याचे व्याजदर निश्चित नसते.

गुंतवणुकीसाठी 20,000 रुपये असे बाजूला काढा :
तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, प्रत्येक महिन्याला 20,000 एवढी रक्कम बाजूला काढून कशी काय गुंतवावी. तर याचं गणित देखील अत्यंत सोपं आहे. समजा तुम्हाला 1 लाख रुपये पेमेंट असेल तर तुम्ही अगदी आरामात 20 हजारांची रक्कम SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवण्यासाठी बाजूला काढू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 27 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या