4 May 2025 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Surya Rashi Parivartan | सूर्य राशी परिवर्तनामुळे 'या' राशींचं नशीब उघडणार; कामाचा व्याप संपून पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार

Surya Rashi Parivartan

Surya Rashi Parivartan | ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक काळापर्यंतच एका ग्रहांमध्ये स्थानापन्न असतात. दरम्यान प्रत्येक महिन्याला स्वतःची जागा बदलत असतात. त्याचबरोबर सर्व ग्रहांचा राजा म्हणजे सूर्यग्रह हा प्रत्येक महिन्याला स्वतःची जागा बदलतोच. ज्योतिष शास्त्रात असं म्हटलं जातं की, सूर्यग्रह ज्या राशींमध्ये येऊन बसतो त्या राशींच्या व्यक्तींचं नशीब उघडल्याशिवाय राहत नाही. धनदौलत, संपत्ती, सुदृढ आरोग्य आणि सर्व चांगल्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत जातात.

डिसेंबर महिन्यात सूर्याचे गोचर :

सूर्यग्रह लवकरच काही ग्रहांमध्ये गोचर करणार आहे. सूर्याच्या गोचरमुळे तीन राशींना याचा भरपूर लाभ अनुभवता येणार आहे. हे गोचर डिसेंबर महिन्यात होणार असून रविवार 15 डिसेंबर 2024 रात्री 10:19 मिनिटांनंतर सूर्य आपली जागा बदलणार आहे. सूर्य थेट धनु राशीमध्ये येऊन बसणार आहे. नेमक्या कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी पाहून घेऊ.

मेष रास

सूर्याच्या धनु राशीत येण्याने मेष राशींना अत्यंत फायदा अनुभवायला मिळणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे चटकन पूर्ण होतील. त्याचबरोबर व्यवसायात चांगली प्रगती देखील पाहायला मिळेल. पूर्वीपेक्षा सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली झालेली असेल.

तुळ रास

तूळ राशींना सूर्याच्या गोचरमुळे द्विगुणीत लाभ अनुभवायला मिळतील. व्यवसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. अनेकांचा प्रमोशन देखील होईल. सूर्यग्रह तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. आज कौटुंबिक जीवन अत्यंत आनंदात जगाल. त्याचबरोबर कामांच्या ठिकाणी अनेकांना बोनस मिळण्याची शक्यता आहे.

धनु रास

धनु राशीचे व्यक्ती त्यांच्या कौटुंबिक जीवनात अत्यंत आनंदी राहतील. डिसेंबर महिन्यापासून धनु राशींचे भाग्य उदयास येईल. कामाबद्दल एखादी गोड बातमी कानावर पडू शकते. धनु राशींना हरवलेल्या गोष्टी परत मिळतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे सुरळीतपणे सुरू राहतील.

Latest Marathi News | Horoscope Today 28 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Surya Rashi Parivartan(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या