3 May 2025 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम

EPFO Passbook

EPFO Passbook | 7 कोटींची संख्या असलेल्या ईपीएफ खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ईपीएफ अंतर्गत लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट एटीएमच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहे.

ईपीएफओच्या नव्या वर्षातील नव्या नियमाच्या याबद्दल याविषयीची घोषणा श्रम रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित्रा डावरा यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी अतिशय जलद सुविधा पुरवली जावी यासाठी ईपीएफओने हा मोठा नियम बनवला आहे.

नवीन वर्जन केले जाणार लॉन्च :

सुमित्रा डावरा यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक ईपीएफओ खाते धारकाला ईपीएफओची आयटी संरचना लवकरच बँकिंग स्तराच्या आधारे करता यावी यासाठी हा नवा प्रयत्न केला जात आहे. 2025 च्या नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये ईपीएफओ आयटी 2.1 लाँच करणार आहे. हे नववर्जन लॉन्च झाल्यानंतर ईपीएफओ खातेदार नियमांमधील सर्व प्रक्रिया पूर्ण करून एटीएम lच्या माध्यमातून पैसे काढू शकणार आहे.

नव्या नियमाचे फायदे जाणून घ्या :

1. ईपीएफओच्या नव्या नियमाचा ईपीएफ खातेधारकांना प्रचंड लाभ होणार आहे. पूर्वी पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस पूर्ण करावी लागायची परंतु आता तुम्हाला थेट एटीएमच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहे.

2. तुम्ही इतर बँकिंग सेवांचा ज्या पद्धतीने लाभ घेता त्याच पद्धतीने तुम्हाला आता ईपीएफ खात्याचा देखील लाभ घेता येणार आहे. पैसे काढण्यासाठी तुम्हाला केवळ एटीएममध्ये जाऊन पैसे काढता येणार आहेत.

3. एटीएम सुविधेमुळे तुम्हाला पैसे काढण्यासाठी जास्त वेळ रखडावं लागणार नाही. तुमची कामे अतिशय जलद गतीने पार पडतील.

एटीएममधून EPF चे पैसे कोण काढू शकतो?

यासंदर्भात डावरा यांनी सांगितले की, दावादार, लाभार्थी किंवा विमाधारक व्यक्ती एटीएमद्वारे आपला दावा सहजपणे मिळवू शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पैसे काढणे एकूण पीएफ बॅलन्सच्या 50% पर्यंत मर्यादित असेल.

ईपीएफओ सदस्य थेट एटीएमचा वापर करून आपल्या दाव्याची रक्कम काढू शकतात. ईपीएफओ बँक खाती ईपीएफ खात्याशी जोडण्याची परवानगी देते. मात्र, एटीएममधून पैसे काढण्यासाठी ही लिंक काम करेल की नवीन पद्धतीचा अवलंब केला जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास लाभार्थी या एटीएम पैसे काढण्याच्या सुविधेचा वापर करण्यास पात्र ठरू शकतात. यासाठी लाभार्थ्यांना आपले बँक खाते मृत सदस्याच्या ईपीएफ खात्याशी लिंक करावे लागू शकते. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook Friday 13 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या