4 May 2025 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल

Bajaj Pulsar RS 200

Bajaj Pulsar | बजाज कंपनीच्या सर्वच गाड्या अत्यंत स्टायलिश आणि सर्व सामान्य व्यक्तींना परवडणाऱ्या असतात. दरम्यान बजाजने आपली नवीन पल्सर आरएस 200 लॉन्च केली आहे. पूर्वीच्या मॉडेलपेक्षा आत्ताची पल्सर आरएस 200 ही मॉडेल अतिशय कमालीची आहे.

या मॉडेलचा स्टायलिश लुक तरुणांना प्रचंड आवडलेला आहे. कंपनी तुम्हाला या पल्सर आरएस 200 मध्ये एकूण 3 प्रकारचे रंग देते. ज्यामध्ये पर्ल मेटॅलिक व्हाइट, ऍक्टिव्ह सॅटिन ब्लॅक आणि ग्लासी रेसिंग रेडचा समावेश आहे. त्याचबरोबर बजाज पल्सर आरएस200 ची किंमत केवळ 1 लाख 84 हजार 115 रुपये आहे.

बजाज पल्सरच्या नवीन मॉडेलचे खास फीचर्स जाणून घ्या :

1. बजाज पल्सर आरएस 200 या मॉडेलमध्ये आडवांसड एलईडी प्रोजेक्टर हॅन्डलॅम्प, डे टाईम रनिंग फीचर त्याचबरोबर नव्याने डिझाईन केलेले इंटिग्रेटेड रियर टेल लॅम्प्स उपलब्ध आहेत.

2. एवढेच नाही तर, बजाज पल्सर आरएस 200 या मॉडेलची आणखीन एक खासियत म्हणजे यामध्ये कनेक्टेड कन्सोल पाहायला मिळतो. ज्यामध्ये ब्लूटूथ बॉण्डेड ग्लास एलसीडी पॅनल त्याचबरोबर जे-टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, एसएमएस अलर्ट आणि कॉल त्याचबरोबर गिअर इंडिकेशन यांसारखे अनेक फीचर्स पाहायला मिळतात.

3. बजाज पल्सर आरएस 200 बद्दल आणखीन सांगायचे झाले तर, यामध्ये २०० सीसी, सिंगल स्पार्क, इंधन इंजेक्टेड, 4-व्हॉल्व्ह 199.5 सीसी BSVI इंजिन उपलब्ध आहे. एवढेच नाही तर ही बाईक तुम्हाला 9750 आरपीएमवर 24.5 पीएस पावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर ही नवीन बाईक 8000 आरपीएमवर 18.7 एनएम टॉर्क जनरेट करते.

4. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार असंही समजत आहे की, बजाज ऑटो लिमिटेड मार्केटिंगचे अध्यक्ष ‘सुमित नारंग’ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बजाज पल्सरचे हे नवीन मॉडेल अत्यंत चांगले आहे. एवढंच नाही तर, सुमित नारंग पुढे असंही म्हटले की, बाईकचे स्पोर्टी ग्राफिक्स, फ्लोटिंग पॅनल्स आणि एरोडायनामिक फुल फेअर स्टाइलिंग त्याचबरोबर लेटेस्ट टेक्निकमुळे बाईक तरुणांच्या सांगली पसंतीस उतरेल अशी आमची अपेक्षा आहे.

Latest Marathi News | Bajaj Pulsar RS 200 Saturday 11 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bajaj Pulsar RS 200(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या