2 May 2025 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ ट्रेड करत आहे. 23 डिसेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनी शेअर 717.70 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. शुक्रवार २४ जानेवारीला टाटा मोटर्स कंपनी शेअर 2.54 टक्क्यांनी घसरून 733.40 रुपयांवर बंद झाला होता.

भारतातील कार उत्पादन क्षेत्रात सर्वात मोठा बाजार हिस्सा असलेल्या टाटा मोटर्स कंपनी एकूण मार्केट कॅप घटून 2,70,231 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे ऑटो क्षेत्रासहित अनेक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी घसरणीसह बंद झाले होते. एनएसईच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी टाटा मोटर्सच्या 95.13 लाख शेअर्सचे ट्रेड पार पडले होते. मात्र काही स्टॉक मार्केट विश्लेषकांनी टाटा मोटर्स शेअर्ससाठी अजूनही सकारात्मक रेटिंग जाहीर केली आहे.

जेफरीज ब्रोकरेज फर्म – टाटा मोटर्स शेअर

जेफरीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 930 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेफरीज ब्रोकरेजने टाटा मोटर्स शेअरची टार्गेट प्राईस 1,000 रुपयांवरून घटवून 930 रुपये केली आहे.

एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टेक्निकल चार्टवरील संकेत

एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे मार्केट विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले की, ‘टाटा मोटर्स शेअर त्याच्या कंसोलिडेशन झोनच्या खाली बंद झाला आहे आणि दैनंदिन चार्टवर टाटा मोटर्स शेअरचा 21 दिवसांचा EMA नकारात्मक संकेत देत आहे. तसेच, शेअरचा आरएसआय देखील मंदीच्या क्रॉसओव्हरमध्ये म्हणजे 41 वर आहे. त्यामुळे स्टॉक ओव्हरसोल्ड पातळीपर्यंत पोहोचण्यापूर्वी अजून नकारात्मक संकेत देत आहे. या टेक्निकल संकेतातून घसरणीचा ट्रेंड दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार ७४५.८ रुपयांच्या पातळीवर शेअरमधून बाहेर पडू शकतात. एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ७२३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price Saturday 25 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(169)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या