2 May 2025 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा

SBI FD Interest Rates

SBI FD Interest Rate | फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय ठरला आहे. एफडी गुंतवणूक योजनांमध्ये महिला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने पैसे गुंतवतात. FD गुंतवणुकीवर उत्तम परतावा दिला जातो. देशातील अनेक लोकप्रिय बँकांमध्ये काही स्पेशल एफडी योजना सुरू झाल्या असून अनेक लोकांनी आतापर्यंत गुंतवणूक करून बंपर परतावा मिळवला आहे.

आज या बातमीपत्रातून आपण 444 दिवसांच्या FD योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँक, इंडियन ओवर सिरीज बँक आणि फेडरल बँक या 3 बँकांच्या ग्राहकांना 444 दिवसांच्या स्पेशल एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. या तिन्ही बँकांमध्ये 444 दिवसांची स्पेशल एफडी योजनेमध्ये 2, 4 आणि 6 लाखांच्या FD गुंतवणुकीवर किती परतावा मिळणारे हे जाणून घेणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया 444 दिवसांची एफडी योजना :
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेला ‘अमृत कलश एफडी’ योजना या नावाने ओळखलं जातं. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी एसबीआय बँकेच्या अमृत कलश एफडीमध्ये पैसे गुंतवले आहेत. या एफडी गुंतवणुकीमध्ये 7.25 टक्के दराने परतावा मिळतो. समजा तुम्ही या योजनेमध्ये 2 लाखांची रक्कम गुंतवली तर, 2,18,267 रुपये परत मिळतील. 4 लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना 436,534 आणि 6 लाखांची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना 6 लाख 54 हजार 801 रुपये मिळतात.

फेडरल बँक 444 दिवसांची एफडी योजना :
फेडरल बँक ही देखील लोकप्रिय बँकिंग पैकी एक आहे. या बँकेत 444 दिवसांच्या एफडी योजनेवर 750% दराने व्याज मिळते. या योजनेमध्ये 2 लाख गुंतवले असता, 2 लाख 18 हजार 919, 4 लाख गुंतवले असता 4 लाख 37 हजार 839 रुपये आणि 6 लाख रुपये गुंतवले असता 6 लाख 56 हजार 759 रुपये परत मिळतील.

इंडियन ओवरसिरीज बँक 444 दिवसांची एफडी योजना :
इंडियन ओवरसिरीज बँकेत 444 दिवसांची FD करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.30% दराने व्याजदर प्रदान केले जाते. या योजनेमध्ये 2 लाखांची रक्कम गुंतवली असता 2 लाख 18 हजार 397 रुपये, 4 लाख रुपये गुंतवले असता 4 लाख 36 हजार 795 हजार रुपये आणि 6 लाखांची रक्कम गुंतवली असता 6 लाख 55 हजार 192 रुपये परत मिळतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI FD Interest Rates(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या