इस्लामाबाद : भारताबरोबर आता चर्चा करण्याची आपली इच्छा राहिलेली नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर फोनवरुन झालेल्या चर्चेनंतर इम्रान खान यांनी द न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीर आणि भारत-पाकिस्तान संबंधांबाबत भाष्य केले.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी सरकारशी आता संवाद शक्य नाही असं सांगितलं आहे. अमेरिकेतील दैनिक न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खाननेभारतावर गंभीर आरोप लावलेत. त्यांनी सांगितलं की, दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत त्यात लढाई झाली तर धोका वाढत जाईल. भारताकडून जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यानंतर पाकिस्तान सैरभैर झालं आहे. इम्रान खान आणि त्यांचे मंत्रीही युद्धाची भाषा बोलत आहेत.

मी वारंवार चर्चेचा प्रस्ताव दिला पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच तो धुडकावून लावला. आता भारताबरोबर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही असे इम्रान या मुलाखतीत म्हणाले. दोन अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये वाढत असलेल्या तणावाबद्दलही इम्रान यांनी चिंता व्यक्त केली. इम्रान यांनी पुन्हा युद्धाचा राग दिला. दोन अण्वस्त्र संपन्न देश समोरासमोर असतील तेव्हा काही होऊ शकते असे इम्रान म्हणाले.

दोन अण्वस्त्र संपन्न देश समोरासमोर असतील तर काहीही होऊ शकते: इम्रान खान