4 May 2024 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा
x

धक्कादायक! फडणवीस सरकारच्या काळात राज्यात जातीय तणाव वाढला: पोलीस खात्याचा अहवाल

Hindu Muslim Riots, dalit riots, CM Devendra Fadanvis, Hindu Violence

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जातीय तणावाचा धक्कादायक अहवाल पोलीसांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारची गोची झाल्याचं म्हटलं जातं आहे आणि विशेष म्हणजे स्वतः फडणवीस यांच्याकडेच गृहखातं असल्यामुळे अडचणीत अधिकच भर पडली आहे. दरम्यान पोलिसांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणाव वाढलं असल्याच समोर आलं आहे. त्यानुसार हिंदु-मुस्लिम तणावाची जागा मागील ५ वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतली असल्याचं दिसत आहे.

त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील भीषण परिस्थितीचं वास्तव उघड्यावर आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यात पोलीस खात्याने निवडणूक आयोगाला थेट राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेसंदर्भात एक सादरीकरणच केल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये राज्यातील हिंदू-मुस्लीम तणावाची जागा मागील ५ वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतल्याचा अहवाल पोलिस खात्याने निवडणूक आयोगाला दिला.

या अहवालानुसार, हिंदू-मुस्लीम धर्मियांतील तणावासाठी राज्यातील ८ जिल्हे संवेदनशील आहेत. तर त्या तुलनेत सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव असलेले १४ जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, पुणे, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम आणि औरंगाबाद हे जिल्हे मुस्लिम आणि हिंदु धर्मियातील तणावाच्या घटनांसाठी संवेदशील आहेत. तर मागील काही वर्षात राज्यात हिंदु-मुस्लिम तणावापेक्षा सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव राज्यात वाढला आहे.

त्यामुळे सर्वत्र सुशासनाचा जागावाज करणारं फडणवीस सरकार तोंडघशी पडल्याचं म्हटलं जातं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस खात्यानेच हा अहवाल दिल्याने विरोधकांच्या हाती आयतंच काहीतरी चालून आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x