पुणे: क्रिकेटच्या मैदानावर दर सामन्यागणिक विक्रम करणारा भारतीय संघाचा कर्णधार व जागतिक दर्जाचा फलंदाज विराट कोहली यानं आज क्रिकेटविश्वातील नवं शिखर ‘सर’ केलं. कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये दीड शतक ठोकण्याचा सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम विराटनं आज मोडला. एवढ्यावरच न थांबता, कसोटीतील सातवं द्विशतक ठोकून त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचा द्विशतकांचा विक्रमही मोडला. तसंच, कसोटीतील ७ हजार धावा पूर्ण केल्या. विराटच्या या खेळाच्या जोरावर भारतानं पुणे कसोटीत ६०० धावांचा डोंगर उभारला आहे.

या खेळीदरम्यान विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावांचा टप्पा ओलांडला. विराटने माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांना मागे टाकलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावांचा टप्पा ओलांडणारे फलंदाज –

विराट कोहली : ३९२ सामने
ब्रायन लारा : ३९६ सामने
सचिन तेंडुलकर : ४१८ सामने

दरम्यान विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमधला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही मोडला. सचिनने कसोटीत २४८ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. विराटने आज सचिनला मागे टाकतं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे.

विराटचा झंजावात, लारा-सचिनचे विक्रम मोडीत