6 May 2024 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

विरोधकांचा प्रश्न राज्यातील मूलभूत मुद्द्यांवर बोलण्याचा; मोदींनी थेट राज्यातील शहीद जवानांशी संबंध जोडला

PM Narendra Modi, Jammu kashmir, Article 370, Martyred Jawans

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. कलम ३७० हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. त्यांना त्रास होत आहे. अशी मंडळी कलम ३७० चा महाराष्ट्राशी काय संबध आहे, असा सवाल विचारत आहेत. कलम ३७० चा महाराष्ट्राशी संबंध काय असे विचारणाऱ्यांनो डूब मरो, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आज अकोला येथे झाली यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ”कलम ३७० शी महाराष्ट्राशी देणंघेणं नाही, असं म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. अशा लोकांनी कान उघडून उघडा की, जम्मू काश्मीर आणि तेथील जनता ही भारतमातेचीच लेकरे आहेत. आज संपूर्ण देश एक होऊन काश्मीरच्या मागे उभा आहे. देशाच्या रक्षणासाठी या शिवरांयांच्या भूमीतील मावळे हौतात्म्य पत्करत आहेत. आणि तुम्ही कलम ३७० चा महाराष्ट्राशी काय संबंध म्हणून विचारणा करता.” असे मोदी म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चं काय घेणंदेणं असे सवाल विचारले जात आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथल्या जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिले आहे. मग, याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला आहे. राज्यात कलम ३७०वरुन विरोधकांनी भाजपाला टार्गेट केल्यानंतर मोदी या मुद्दावरुन आक्रमक झाले आहेत. अकोला येथे महायुतीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

मोदी म्हणाले, “महाराष्ट्रातील विरोधीपक्षांना लाज नाही, त्यामुळे ते खुलेपणाने विचारत आहेत की काश्मीरचा महाराष्ट्राशी संबंध काय?. असा आवाज उठवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो त्यांनी कान उघडून ऐकावं. जम्मू-काश्मीरचे लोकही भारताचीचं मुलं आहेत. महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथून कोणत्या जावानाने काश्मीरच्या शांततेसाठी बलिदान दिले नसेल. महाराष्ट्रातील जवानांनी काश्मीरमध्ये शत्रूंशी निकराचा लढा दिला. कारण त्यांना माहिती होतं आपण शिवाजी महाराज्यांच्या राज्यातून आलो आहोत. या विश्वासानीच त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन बलिदान दिले. आम्हाला राज्यातील या जवानांच्या बलिदानाचा अभिमान आहे. मात्र, आज केवळ आपल्या कुटुंबाचे पोषण करणारे राज्यातील लोक विचारतात की, राज्याचा जम्मू-काश्मीरशी संबंध काय? असा प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या विधानावर लाज वाटायला हवी. त्यांनी बुडून मरावं.”

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x