5 May 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

यापुढे फक्त मनसे पक्षहित? मनसे नाशिकच्या दत्तक पुत्रांसोबत; महापौरपद भाजपाकडे

Satish Kulkarni, Nashik Mayor Satish Kulkarni, BJP

नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ऐतिहासिक अशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकासाआघाडी अस्तित्वात आली आहे आणि दुसऱ्याबाजूला २५ वर्षांपूर्वीची भाजप-शिवसेनेची युती केंद्रापासून संपुष्टात आली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करत अप्रत्यक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पसंती दिली होती. मात्र त्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता.

मात्र शिवसेनेने सध्या सुरु केलेल्या राजकीय भूमिकेमुळे भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील तर होणार नाही ना अशी चर्चा रंगण्याची शक्यता आहे. राजकारणात सध्या पक्षीय भूमिकांना महत्व उरलं नसून सत्तेत विराजमान होणं एवढंच उद्दिष्ट असल्याचं सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दिसत आहे. त्यामुळे इतर सर्व पक्ष केवळ पक्ष स्वार्थ बघून निर्णय घेत असताना राज ठाकरे यांची मनसे मात्र तत्वांमध्ये गुरपटल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र पक्ष वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जशा ऐतिहासिक भूमिका घेतल्या तसाच भूमिका भविष्यत राज ठाकरे यांनी घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.

त्याची सुरुवात सध्या नाशिकमध्ये सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत. आज सकाळी झालेल्या निवडणुकीत सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी देखील भाजपाला साथ दिली. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या दहाही बंडखोरांनी बंडखोरी मागे घेत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा केल्याने भारतीय जनता पक्षाचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महासेनाआघाडी होत असताना, तिकडे नाशिकमध्ये नवी समीकरणं जुळली आहेत. नाशिकमध्ये महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS supports BJP) एकत्र आली. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र येऊनही महापौरपद (MNS supports BJP)आपल्याकडे राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आलं. नाशिकच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे सतीश कुलकर्णी (Nashik Mayor BJP Unopposed) बिनविरोध निवडून आले आहेत.

राज्यात होत असलेल्या महाशिवआघाडीप्रमाणे नाशिकमध्ये देखील शिवसेनेने पुढाकार घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यातच भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेले १० ते १५ भारतीय जनता पक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले होते, त्यामुळे ६५ नगरसेवक असूनही भारतीय जनता पक्ष अडचणीत आली होती, मात्र मनसेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला तर महाशिवआघाडीत असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपदावर दावा केल्याने वाद वाढला आणि महाशिवआघाडी फुटली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा विजय सुकर झाला.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x