30 April 2024 5:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

फडणवीसांनी पत्रकार परिषदेत राजीनामा देण्याचं जाहीर केलं

Devendra Fadnavis Resigned

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.

अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन करणार नाही. आम्ही आमदार फोडणार नाही. ही पत्रकार परिषद झाल्यावर मी राज्यपालांना भेटून राजीनामा देणार आहे. शिवसेनेने लाचारी पत्करली आहे म्हणूनच शिवसेनेने काल सोनिया गांधी यांच्या नावाची शपथ घेतली. यापेक्षा लाचारी काय? आम्ही विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय जनता पक्षाला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x