6 May 2024 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका
x

राहुल गांधींना माफीचे डोस पाजून मोदी स्वतः महिला शिक्षिकेच्या खुनातील आरोपीच्या प्रचारात

Rahul gandhi, Narenda Modi

नवी दिल्ली: देशभरात केंद्रातील भाजप नेतृत्वातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोषामुळे भडका उडाला आहे. काँग्रेसदेखील याचा विरोध करण्याकरिता स्त्यावर उतरलेली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक अशा रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता रॅलीला सुरुवात होणार असून यामध्ये नागरिकत्व सुधारणा विधयेक, वाढती महागाई, महिला सुरक्षा, सर्वसामान्यांची होणारी लूट या सारख्या विषयावर रॅलीतून प्रहार करण्याची योजना आखण्यात आली आहे.

दरम्यान, आजच्या रामलीलावरील भाषणावेळी राहुल गांधी म्हणाले, “काल संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे त्यासाठी माझ्याकडून माफी मागितली जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल.”

तत्पूर्वी, झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले डॉ. शशिभूषण मेहता यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत व्यासपीठावर स्थान मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. शशिभूषण मेहता यांच्यावर खुनाचा आरोप असून ते सध्या जामीनावर आहेत. परंतु, महिला शिक्षिकेच्या खुनात आरोपी असलेल्या शशिभूषण मेहता यांना भारतीय जनता पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, ते चक्क पंतप्रधान मोदींच्या स्टेजवर दिसत आहेत.

शशिभूषण मेहता यांनी मोदींच्या सभेला उपस्थिती लावत चक्क स्टेजवर प्रवेश दिला जातो. त्यानंतर, मोदींसोबत स्टेजवर एका खुनातील आरोपीला स्थान मिळतंय, असे म्हणत त्यांचा फोटो तेथील समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. भारतीय जनता पक्षाने शशिभूषण यांना पंकी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मेहता यांच्यावर खुनाच आरोप असून २०१२ मध्ये ही घटना घडली आहे. मेहता हे ऑक्सफर्ड पल्बिक स्कुलचे संचालक असून २०१२ मध्ये त्यांना शाळेतील शिक्षिकेच्या मर्डरप्रकरणी अटक करण्यात आली होती. स्कुल वार्डन सुचित्रा मिश्रा यांचा खून केल्याचा आरोप मेहता यांच्यावर आहे.

Web Title:  BJP Targeted MP Rahul Gandhi Over Rape in India Statement in Parliament

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x