5 May 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

संपूर्ण देश घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांसोबत आणि प्रवीण तरडेंनी सर्वांना जबरदस्ती भाजपसोबत जोडलं

Pravin Tarde, JNU Attack

पुणे: जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना हल्ला केला होता. त्यामुळे, देशभरात विद्यार्थी संघटनांनी एकत्र त्याचा निषेध नोंदवत आंदोलन केलं. या आंदोलनात अनेक सिनेकलाकार सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वांनीच या घटनेचा निषेध नोंदवला. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही जेएनयुतील विद्यार्थ्यांची भेट घेतली. देशभरात जेएनयुचा मुद्दा गाजत असताना, प्रविण तरडेंनी एका फेसबुक पोस्टवर कमेंट करताना, संपूर्ण देश भाजपासोबत आहे, असे म्हटले. त्यामुळे, नेटीझन्सने तरडेंना ट्रोल केलंय.

पत्रकार राजू परुळेकर यांनी फेसबुक’वर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये, ”एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात. ठरवा.” अशी पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. त्यांच्या या पोस्टवर अभिनेता प्रविण तरडेंनी कमेंट करताना, ‘संपूर्ण देश भाजपासोबत’ असे म्हटले. तरडेंच्या कमेंटवरुन नेटीझन्सने त्यांना चांगलच ट्रोल केलंय. विशेष म्हणजे जवळपास 2 हजार जणांनी तरडेंना कमेंटमधून उत्तर दिलंय. त्यामध्ये तरडेंच्या कमेंटचा समाचार घेतलेल्याच कमेंट सर्वाधिक आहेत.

जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सध्या देशभर आंदोलन सुरू आहेत. त्या कॅम्पसमधील आंदोलनात अनेक सिलीब्रीटी व्यक्ती देखील सामील होतं आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत.

विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात ३४ विद्यार्थी जखमी झाले असून, विद्यार्थी संघटनेची आईशी घोष ही जखमी झाली आहे. जेएनयूचा माजी विद्यार्थी कन्हैय्या कुमार या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला आहे. कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू असताना कन्हैय्या जय भीम जय भीमच्या घोषणा देत होता. त्याचवेळी दीपिका आंदोलनस्थळी दाखल झाली. दीपिकानं केवळ आईशीसोबत काही वेळ चर्चा केली आणि त्यानंतर ती निघून गेली. यावेळी तिनं मीडियाशी कोणत्याही प्रकारे संवाद साधला नाही.

दरम्यान, मराठी कलाकारांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीने देखील या घटनेचा निषेध करत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. सोनाली कुलकर्णीने ट्विटवर संताप व्यक्त करत केंद्र सरकारवर देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘आपण आपल्याच देशातील विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि आपण इतर देशातील अल्पसंख्याकांना सुरक्षा द्यायला निघालो आहोत’ असं ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, बंगळुरू येथे विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर या घटनेचा निषेध केला आणि गुन्हेगारांना धडा शिकविण्याची मागणी केली. तसेच देशात विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्था सुरक्षित नसल्याचं सांगत सरकारचा देखील निषेध केला आहे.

 

Web Title:  Netizens were outraged Marathi Film Actor Pravin Tarde comment whole country with BJP.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x