28 April 2024 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

शिवसेनेचे ५४ पैकी ३५ आमदार नाराज: नारायण राणे

MP Narayan Rane, Shivsena MLAs

मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत न जाता राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, “भारतीय जनता पक्ष कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वत: आली होती. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुणाचीही फिकीर नाही. खरतर काळजी करण्याची गरज त्यांना आहे. कारण त्यांचे ५४ पैकी ३५ आमदार नाराज आहेत”, असे नारायण राणे म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. ‘या सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. हे सरकार अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. सरकारला सिरीयस बेस नाही. राज्याचे प्रशासन माहिती नाही. विकास माहिती नाही. अशा माणसाच्या हातात सत्ता गेल्याने त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवायची?’ असा बोचरा सवाल करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

‘सीएएबाबत आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला शिकवण्याची गरज नाही. भाजपमध्ये शिकलेले लोक आहेत. आदित्य ठाकरेंना कायदा काय माहीत आहे? जी मंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी आधी नीट पार पाडावी. त्यातील काय कळतं हे आधी बघावं आणि नंतर भारतीय जनता पक्षावर बोलावं,’ असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला आहे.

तसेच संधी न मिळाल्याने शिवसेनेत मोठ्याप्रमाणावर नाराजी असल्याचे समोर आले होते. तर याच मुद्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेतील निष्ठावंताना डावलून उपऱ्याना संधी देण्यात आली असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

 

Web Title:  Shivsena 35 MLAs are not happy on alliance made with NCP and Congress says MP Narayan Rane .

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x