3 May 2024 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार
x

अपमान! मोदींची महाराजांशी तुलना हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान: भाजपचे माजी आ. हळवणकर

BJP Former MLA Halvankar, chhatrapati Shivaji Maharaj, Aaj Ke Shivaji Narendra Modi

पुणे : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर राज्यांच लक्ष वेधलं आहे. उदयनराजे भोसलेंनी राजकारणासाठी पत्रकार परिषद घेतली नसल्याचं सुरूवातीलाच स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली आहे.

छत्रपतींच्या घराण्याची यापुढे बदनामी कराल तर गाठ माझ्याशी आहे हे भुंकणाऱ्यांनी लक्षात ठेवाव. विनंती फिनंती करत बसणार नाही पुस्तक प्रकाशन बंद करायलाच लावत असतो. राजेशाही असती तर पुस्तक काढणारा तो गोयल पुन्हा दिसला नसता असं म्हटलं आहे. मात्र आता वाद निवळण्यास सुरुवात झालेली असताना भाजपचे माजी आमदार हळवणकर यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारं विधान केलं आहे आणि त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज नेमकी या भाजप आमदारावर काय कारवाई करणार ते पाहावं लागणार आहे.

‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकासंदर्भातील वादावर प्रितिक्रिया देताना भाजपाचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदींशी शिवाजी महाराजांची तुलना करणे चुकीचे नाही. या पुस्तकाचे लेखकाचे मी समर्थन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराजांच्या तुलनेत गैर काहीच नाही. ही तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानच आहे,” असं मत हळवणकर यांनी भाजपाच्या बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केलं.

‘नरेंद्र मोदी हेच शिवाजी’ असे सांगणाऱ्या लेखकावर कारवाई का झाली नाही? पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. हे सर्व जाणूनबुजून करणाऱ्या फुटकळ लेखकाला भारतीय जनता पक्षातून एव्हाना हाकलून का दिले नाही ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मुक्ताफळे उधळली आहे.

 

Web Title:  Actually its an Honour for chhatrapati Shivaji Maharaj to get compare with PN Narendra Modi says BJP Former MLA Halvankar.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x