29 April 2024 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

शिक्षण-पर्यटनाचं आधुनिक राजकारण! आदित्य ठाकरेंची फेसबुक-इंस्टाग्रामच्या कार्यालयाला भेट

Aaditya Thackeray, Facebook and instagram Delhi Office

नवी दिल्ली: शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीत आले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांची पुन्हा भेट झाली आहे.

मागे त्यांची राहुल गांधी यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती. उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी पार पडला तेव्हाही राहुल गांधी अनुपस्थित होते. दरम्यान अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर राहुल-आदित्य यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भेटीत आदित्य राहुल यांना तिळगुळ देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल माहिती दिल्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी फेसबुक-इन्स्टाग्रामच्या मुख्यालयाला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी ट्विटवर फोटो शेअर करत या भेटीमुळे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार खूप काम करु शकतं याची माहिती मिळाल्याचं म्हटलं होतं.

 

Web Tiles:  Environment and Tourism Minister of Maharashtra Aaditya Thackeray visited Facebook and Instagram Delhi offices.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x