5 May 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा
x

न्यायाधीश लोया मृत्यू चौकशी संबंधित महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

Judge Loya Death Case, Amit Shah

मुंबई: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच गरज भासल्यास आणि पुरावे समोर आल्यास न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते असं म्हटलं होतं. त्यानंतर जज लोया यांच्या मृत्यूनंतर लोयांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या आणि या प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन महत्वाची कागदपत्रं हाताळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्य झाल्याचं वृत्त नॅशनल हेराल्ड’ने दिलं आहे. १३ जानेवारी रोजी उस्मानाबादमध्ये त्यांचे निधन झाले. रवींद्र भारत थोरात हे मृत्यूच्या वेळी उस्मानाबाद युनिट अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) मध्ये कार्यरत होते.

तत्कालीन राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख बर्वे यांनी त्यावेळी असा निष्कर्ष काढला होता की न्यायाधीश लोया यांचे १ डिसेंबर २०१४ रोजी न्यायालयीन व्यवस्थेतील सहकाऱ्याच्या उपस्थितीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नॅशनल हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, बर्वे यांच्या टीमचे सदस्य म्हणून काम करत असताना थोरात यांनी जज लोयांच्या मृत्यूशी संबंधित संवेदनशील फाइल्स आणि सर्वोच्च न्यायालयसंबंधित अत्यंत महत्वाची कागदपत्र हाताळण्याची जबाबदारीही पार पाडत असत असं म्हटलं आहे.

नॅशनल हेराल्डच्या वृत्तानुसार थोरात यांनी १ जानेवारीला अस्वस्थ वाटत असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यानंतर त्यांना सोलापूरस्थित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी घेऊन जाण्याचा निर्णय झाला, मात्र प्रवासातच त्यांची प्रकृती जास्तच खालावली होती आणि त्यानंतर रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला.

मात्र त्यांच्याबाबत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की थोरात यांनी न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणात दोन वेगवेगळ्या विषयांवरील चौकशीत काम केलं होतं. २०१४ मध्ये जज लोयाच्या मृत्यूनंतर लगेचच थोरात यांना लोया यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र थोरात यांना जज लोया यांच्या ते शक्य झालं नाही, कारण जज लोया यांच्या मृत्यूनंतर त्यांचं कुटुंब संपर्काबाहेर गेलं होतं. याच चौकशी संबंधित दुसऱ्या विषयात देखील महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या नेतृत्वात लोयाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एक टीम गठीत केली होती आणि थोरात हे बर्वेच्या त्या टीमचा महत्वाचा भाग होते.

 

Web Title:  Police officer associated with judge loya death case dead following major heart attack.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x