मुंबई: आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा खिल्ली उडवत शिवसेनेवर टीका केली आहे. “हे सरकार गोंधळलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टीवर गेले आहेत. ६० दिवसात काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना थकवलं आहे. त्यामुळेच ते ३ दिवस सुट्टीवर गेले आहेत. कॅबिनेटमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतात.
शिवसनेचे मंत्री हे टेबलवरील पेन आणि फाईल उचण्याचे काम करत असून, कॅबिनेटमध्ये कारकून सारखे बसलेले असतात,” असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यातील सरकार हे शिवसनेनचं नाहीच, कारण त्यांचे मंत्री कॅबिनेटमध्ये कारकून सारखे वागतात. सर्व निणर्य फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रीच घेतात असा टोलाही नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
तत्पूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी देखील याच विषयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. यावर माजी खासदार निलेश राणे ट्विट करत म्हटलं होतं की, ‘मी १९९५ पासून ते २०१९ पर्यंत ६ मुख्यमंत्री बघितले पण त्या पदावर असताना त्यांनी सुट्टी घेतलेली आठवत नाही. जवळपास ३ महिने झाले आणि उद्धव ठाकरे ३ दिवस सुट्टीवर. काय मोठा पराक्रम केला ह्या तीन महिन्यात की ह्यांना सुट्टी घ्यावी लागली. झेपत नसेल तर खुर्ची खाली करा’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली होती.
मी १९९५ पासून ते २०१९ पर्यंत ६ मुख्यमंत्री बघितले पण त्या पदावर असताना त्यांनी सुट्टी घेतलेली आठवत नाही. जवळपास ३ महिने झाले आणि उद्धव ठाकरे ३ दिवस सुट्टीवर. काय मोठा पराक्रम केला ह्या तीन महिन्यात की ह्यांना सुट्टी घ्यावी लागली. झेपत नसेल तर खुर्ची खाली करा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 31, 2020
Web Title: MLA Nitesh Rane criticized chief Minister Uddhav Thackeray.
