3 May 2024 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

संदीप मोझर समर्थक १०७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे : सातारा

सातारा : साताऱ्यातून पुन्हा मनसेसाठी आनंदाची बातमी आहे, कारण संदीप मोझर समर्थक १०७ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे मागे घेतले आहेत. तसेच मनसेमध्ये एकत्र राहूनच समाजसेवा करण्याचा मैत्रीपूर्ण सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुढे उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, मनसे हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष होता आणि माझे अनुकरण करत ज्या कार्यकर्त्यांनी पक्षत्याग केला होता त्यांनी राजीनामे मागे घेऊन सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या मनसे पक्षाच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन पक्षाच्या ध्वजाचा सन्मान करावा असे आव्हाहन सुद्धा उपस्थित कार्यकर्त्यांना केलं.

पुढे उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, मी माझ्या व्यक्तिगत कारणाने राजकीय प्रवासातून स्वतःहूनच दूर झालो असलो तरी यापूर्वी केलेली कोणतीही आंदोलनं अर्ध्यावर सोडणार नाही तर ती अधिक जोमाने समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर राहणार आहे. संदीप मोझर हा संकटावर मात करून आभाळात विहार करणारा गरुड आहे आणि कोणत्याही वादळवाऱ्याला घाबरणारा कबुतर नाही असे ही स्पष्ट केले.

त्यांनी सर्व १०७ पदाधिकाऱ्यांना पक्षाचे राजीनामे मागे घेण्याच्या सूचना केला असून त्यानुसार सर्वांनी त्या आशयाचे पत्र पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविले आहेत. त्या वेळी मनसे शेतकरी सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष दिलीपतात्या सुर्वे, मनसे कामगार सेनेचे राज्य चिटणीस सचिनभाऊ पवार, मनसे परिवहन सेनेचे राजाभाऊ बर्गे, सहसचिव चंद्रकांत पवार, वाई तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पिसाळ, मनसे जनहितकक्षाचे मनोजभाऊ माळी, जिल्हा सचिव रमेश सावंत, मनसे महिला सेनेच्या मनीषा चव्हाण, स्वाती माने, भरती गावडे आणि अनिता जाधव हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण सातारा जिल्हा हा मनसेचा बालेकिल्ला करेन हा राजसाहेब ठाकरेंना दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माझ्या सर्व समर्थकांनी पक्षात राहूनच प्रामाणिक प्रयत्नं करावेत. तेच सत्यात उतरविण्यासाठी मनसेचे सर्व पदाधिकारी, स्वराज्य प्रतिष्ठान आणि विविध संघटनांतून माझ्यासमवेत मनसेमध्ये आलेले सर्व मावळे प्रयत्न करतील.

शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम हाती घेण्याविषयी आणि त्या मोहिमेचा प्रारंभ अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्याविषयी माझी राजसाहेब ठाकरे सातारा दौऱ्यावर आले होते तेव्हा चर्चा झाली होती. परंतु मी पक्षात नसलो तरी त्या शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीमचा प्रारंभ हा अमित ठाकरेंच्याच हस्ते करण्यात येईल असेही संदीप मोझर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

हॅशटॅग्स

#Raj Thakarey(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x