30 April 2024 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

कोरोना आपत्ती: ओडिशा सरकारने ३० एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाऊन

Corona Crisis, Covid19, Odisha CM Naveen Patnaik, Odisha LockDown

भुवनेश्वर, ०९ एप्रिल: देशामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. अशात ओडिशा सरकारने लॉकडाऊनचा अवधी वाढवला आहे. २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन संपण्यापूर्वीच ओडिशा सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वीच ओडिशा सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारे ओडिशा देशातील पहिले राज्य आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी याची घोषणा केली ओडिशामध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन असणार आहे. विशेष म्हणजे १७ जूनपर्यंत ओडिशातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे. ३० एप्रिलपर्यंत देशातील विमानसेवा, रेल्वे सेवा सुरू करू नये, असं त्यांनी म्हटलं.

ओडिशात आतापर्यंत करोनाचे ४२ रुग्ण आढळले आहेत. यांपैकी २ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भुवनेश्वरमध्ये ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. करोनामुळे राज्यात झालेला हा पहिला मृत्यू होता. या ७३ वर्षीय व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला आणि तपासणीत तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते असे अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले. तपासणीचा अहवाल मंगळवारी आला. मृत्यू पावलेली व्यक्ती ही झारपाडा परिसरात राहणारा आहे.

 

News English Summary: Corona virus is on the rise in the country. In this way, the Odisha government has extended the lock down period. Before the end of the 21-day nationwide lock down, the Odisha government has decided to extend the lock down by April 30 in the wake of Corona. The Odisha government has raised the lock down even before the central government decides to extend the lock down. Odisha is the first state in the country to decide on a lock down.

News English Title: Story lock down Odisha Chief minister Naveen Patnaik extends lock down till April 30th Covid19 Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x