6 May 2024 9:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

भाजपच 'चलो मुंबई', रेल्वे मंत्रालयाकडून ३ विशेष ट्रेन

औरंगाबाद : सध्या निवडणुकांचं वातावरण देशभरात आणि राज्यात तापू लागलं आहे. त्यामुळेच ६ एप्रिल हे भाजपच्या स्थापन दिवसाचं कारण घेऊन भाजप मुंबईमध्ये शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीच मराठवाड्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. इतकच नाही तर पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने खासगी वाहनातून कार्यकर्ते घेऊन येण्याचे टार्गेटच पक्षाने दिले आहे.

एकट्या मराठवाड्यातून २ लाख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळाव्यासाठी आणण्याचे जोरदार प्रयत्न पक्षाकडून केले जात आहेत. त्यासाठीच तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याचे समजते. ६ एप्रिल हे भाजपच्या स्थापन दिवसाचं औचित्यसाधून भाजप शक्तिप्रदर्शनच्या तयारीला लागला आहे. त्यामुळेच राज्यातील तालुका पातळीवर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठीच पदाधिकाऱ्यांना ‘चलो मुंबईचे’ आदेश देण्यात आले आहेत.

सहा एप्रिल रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईस्थित बीकेसी मैदानात ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपच्या सरपंचापासून ते खासदारापर्यंत सर्वांना खासगी गाडीने कार्यकर्ते मुंबईला घेऊन येण्याचे आदेशच वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे अण्णांच्या दिल्लीमधील लोकपाल आंदोलनाच्या पाश्वभूमीवर अण्णांचे अनेक समर्थक दिल्लीला रेल्वेने येणार होते, परंतु केंद्र सरकारने जाणीवपूर्वक अनेक लांब पल्याच्या रेल्वे फेऱ्या रद्द केल्याचा आरोप अण्णांनी केंद्र सरकारवर केला होता. परंतु भाजपच्या ६ एप्रिल रोजीच्या स्थापना दिवसासाठी रेल्वे मंत्रालयाने तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला असून सर्व काही ‘होऊ द्या खर्च’ असंच काहीस चित्र आहे. नांदेडच्या रेल्वे विभागीय कार्यालयाकडे अजून तशा संदर्भात सूचना मिळालेल्या नाहीत. तरी एफटीआर प्रमाणे या विशेष रेल्वे बोर्डाकडूनच आरक्षित करण्यात आल्या आहेत.

भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे एक बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना गर्दी जमवण्याचे निरनिराळे प्रकार सुचवले होते. परंतु त्याच दरम्यान त्यांनी ‘फुकट जायचं, फुकट यायचं’ असं वक्तव्य केल्याने बराच वाद झाला होता आणि त्यांच्या त्या वक्तव्याची समाज माध्यमांवर नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडविली होती. परंतु त्यांच्या त्या वक्तव्याचा परिणाम थेट कार्यकर्ते आणण्यावर होऊ शकतो असं म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x