GK - ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली (महाराष्ट्र)
स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणालीबद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.
ब्रिटीशांच्या काळातील भारतातील (महाराष्ट्रातील शिक्षणपद्धती)
- 1781 मतरशाची स्थापना – वॉरेन हेस्टिंग्ज अरबी आणि पारशी भाषेच्या अध्यायनासाठी
- 1791 बनारसला संस्कृत पाठशाळा – जोनाथम डंकब (बनारसचा इंग्रजी रेसिडेंट)
- 1800 – Fort William College – लॉर्ड वेलस्ली
- कंपानीच्या प्रशासकीय अधिकार्यांना शिक्षण देण्यासाठी. 1802 मध्ये हे कॉलेज कंपनीच्या संचालकांच्या आदेशावरून बंद केले.
- 1813 च्या चार्टर ऍक्ट नुसार भारतात विद्येच्या प्रसारासाठी वार्षिक एक लक्ष रुपये कंपनीने खर्च करावे अशी तरतूद
- राजा राममोहन रॉय यांनी शिक्षण पाश्चात्य शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाई.
- वार्षिक एक लक्ष रुपये कसे खर्च करावे यावर ब्रिटीशांच्या लोकशिक्षण समितीत 2 गट-
- 1. H.T प्रिन्सेस – प्राचीन भारतीय भाषेच्या आणि विद्येच्या प्रसारासाठी खर्च करावेत.
- 2. इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षणासाठी खर्च करावेत.
- हा वाद सोडण्यासाठी बेंटिंगने लॉर्ड मेकॉल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
- मेकॉलने दुसर्या गटाचे (इंग्रजी शिक्षणाचे) जोरदार समर्थन केले.
मेकॉल समिती :
- अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणार्या यूरोपियन विज्ञान व साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल.
- पूर्वेकडील (भारतीय) भाषांमधील शिक्षणासाठी कोणतेही धन उपलब्ध होणार नाही.
- शिक्षणाचे माध्यम – इंग्रजी भाषा
- मेकॉल असा वर्ग निर्माण करू इच्छित होता.
- “जो रक्त व रंगाने भारतीय असेल पण प्रवृत्ती, विचार, नितीमत्ता, बुद्धिमत्तेने इंग्रज असेल.”
- म्हणजेच मेकॉलेला कंपनीसाठी कमी दर्जाच्या जागेवर काम करणारे करड्या रंगाचे इंग्रज बनवायचे होते.
जेम्स थॉमसनची शिक्षण व्यवस्था:
- वायव्य सरहद्द प्रांतात (1843-53)
- देशी भाषेच्या ग्रामीण शिक्षणाची व्यवस्था
- ग्रामीण भागात कृषि विज्ञानासारखे विषय स्थानिक भाषेतून शिकवण्याची व्यवस्था सूरु केली.
- वुडचा अहवाल – 1854 हा अहवाल भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हणून ओळखला जातो.
- सरकारच्या शिक्षण धोरणाचा उद्देश पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे आहे. त्यामुळे सरकारने युरोपियन तत्वज्ञान विज्ञान, कला, साहित्य यांचा प्रसार करावा.
- प्राथमिक शाळा – प्रादेशिक भाषेचा शिक्षणासाठी वापर – खेड्याच्या पातळीवर
- जिल्हा स्तरावर – हायस्कूल (माध्यमिक) आणि महाविद्यालये – इंग्रजी व प्रादेशिक भाषेचा वापर
- पदवी – इंग्रजी भाषेचा वापर (उच्च शिक्षणासाठी)
- शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना चालना देण्यासाठी अनुदान पद्धती सुरू करावी.
- लंडन विद्यापीठाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुंबई, मद्रास, कोलकाता इथे विद्यापीठे स्थापन करण्यात यावीत.
- कंपांनीच्या प्रत्येक प्रांतात लोकशिक्षण विभाग स्थापन करावा
- वुडच्या अहवालात व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणावर (Technical)जोर
- अध्यापक परिक्षण संस्था स्थापन करण्यात याव्यात (इंग्लंडच्या धर्तीवर)
- स्त्री-शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची शिफारस
हंटर समिती (1882-83)
वुडचा अहवाल लागू केल्यानंतर शिक्षणाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी हंटर समितीची स्थापना
हंटर आयोगाचे कार्यक्षेत्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण होते.विद्यापीठांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात समावेश नव्हता.
शिफारस. 1. प्राथमिक शिक्षण – स्थानिक भाषेतून घ्यावे
2.प्राथमिक शिक्षणाचे नियंत्रण जिल्हा व नगर नियोजन मंडळाकडे दिले जावे.
3. माध्यमिक शिक्षणाचे दोन प्रकार असावेत.
a.साहित्य शिक्षण – पुढील विद्यापीठीय अभ्यासासाठी
b.व्यवहारीक शिक्षण – व्यापारासाठी किंवा व्यवसायासाठी विद्यार्थी तयार करणे
शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना पूर्ण चालना द्यावी. सरकारने लवकरात लवकर महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणातून स्वतःला बाजूला करावे.
स्त्री शिक्षणाला चालना देण्याची शिफारस
शॉमस रॅले समिती:
- या समितीच्या अहवालानुसार ‘भारतीय विद्यापीठ कायदा 1904‘ करण्यात आला.
- भारतीय विद्यापीठ कायदा (1904)
- विद्यापीठावरील सरकारचे नियंत्रण वाढवले.
- खाजगी महाविद्यालयांवरील सरकारचे नियंत्रण अधिकच दृढ करण्यात आले.
- विद्यापीठांचे क्षेत्र ठरविण्याचा अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला.बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे (1904)
सॅडलर समिती (1917-18)
- कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी या आयोगाची निर्मिती
- अध्यक्ष– M.E.सॅडलर
- सदस्य – आशुतोष मुखर्जी (भारतीय), झियाउद्दीन अहमद (भारतीय)
हाटोंग समिती:
- शिक्षणविषयक घसरणार्या दर्जावर अभ्यास करण्यासाठी नेमली.
तरतुदी
- प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्व देण्यात आले.
- शिक्षणात सुधारणा व संघटनांवर भर देण्यात यावा.
- ग्रामीण विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर रोखले पाहिजे आणि त्यांना व्यावसायिक व औद्योगिक शिक्षणाकडे वळविले पाहिजे.
वर्धा योजना / मौलिक व आधारभूत शिक्षण:
- तत्व-काम करताना शिक्षण
- मातृभाषेतून शिक्षण
- ही योजना झकिर हुसेन समितीने पुढे आणली.
Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, ias online classes, learning app, Current Affairs, current affairs quiz, gktoday, gk today, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.
Subject English Searching Title: British kalatil shikshan pranali study for competitive exams general knowledge and current affairs in Marathi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER