6 May 2024 10:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

मी ४ वेळा मुख्यमंत्री झालो, पण 'चाय पे खर्चा' इतका ? शरद पवार

मुंबई : मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा विराजमान झालो, पण मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानावर इतका खर्च कधीच आला नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात अशी कोणती ‘चाय पे चर्चा’ होत असते की त्यासाठी एवढा खर्च होतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विधानसभेत अधिवशेषण काळात चर्चा रंगली ती उंदीर घोटाळा आणि मुख्यमंत्री कार्यालयातील ‘चाय पे खर्चा’ या विषयांवर ज्यामुळे फडणवीस सरकारची नाचक्की झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हे सर्व माहितीच्या अधिकारातच उघड झालं आहे. नेमका तोच धागा पकडून शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मी सुद्धा ४ वेळा राज्याचा मुख्यमंत्री झालो, परंतु कार्यालयातील चहावर इतका खर्च कधी झाला नाही असा टोमणा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

पुण्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची सांगता आज शरद पवार यांच्या हस्ते झाली तेव्हा ते बोलत होते. राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय पटसंख्येवर आधारित आहे आणि पटसंख्या विषय दुर्लक्ष करण्यासारखा नाही. परंतु पटसंख्या कुठे आणि कशी बघावी याचं तारतम्य असायला हवं असं ही पवार म्हणाले. विकासकामात कपातीचा विचार असता कामा नये असं परखड मत व्यक्तं करताना पवार म्हणाले की, मी स्वतः या गंभीर विषयावर शिक्षकांचे प्रतिनिधी बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x