3 May 2024 2:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

गुजरातचं भाजप सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवतंय - आ. रोहित पवार

MLA Rohit Pawar, Gujarat Govt, Corona Virus

पुणे, ३० मे : कोरोनाच्याबाबतीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे सरकार चांगले काम करत आहेत. विरोधकांकडून केवळ राजकारण करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाबाबतचे आकडे लपवत नाही. मात्र, भाजपची सत्ता असलेले गुजरात सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी करत राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतलाय. महाराष्ट्रात कोरोना विषाणूबाबतची चाचणी संख्या वाढली म्हणून रुग्ण संख्या वाढतेय, असा दावा त्यांनी यावेळी केला.

केंद्रातील मोदी सरकाने मोठी घोषणा केली. ही केवळ घोषणा आहे. कारण घोषणा केलेले पॅकेज हे २० लाख कोटी रुपयांचे नसून प्रत्यक्षात १ लाख ६० हजार कोटी रुपयांचे आहे. राज्याचेही स्वतंत्र पॅकेज येईल, असं सांगत आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारवर टीका करत ठाकरे सरकारचे कौतुक केले.

पुण्यात एमपीएससी स्टुडंट्स राईट्स आणि सृजन फाऊंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना फूड पॅकेट दिले जात आहेत. त्या उपक्रमाला रोहित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ठाकरे सरकारचे कौतुक आणि केंद्रातील सरकावर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या परिस्थितीत भाजपकडून होणाऱ्या टीकेकडे लक्ष द्यायची गरज नाही. मजुरांना पहिल्याच टप्प्यात रेल्वेने त्यांच्या राज्यात सोडवायला पाहिजे होते, म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.

दरम्यान, न्यायमूर्ती जे.पी. परडीवाला आणि आय.जे वोरा यांच्या खंडपीठानं मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या नेतृत्त्वाखालील सरकारला याविषयीचे खडे बोल सुनवत परिस्थिती अत्यंत वाईट आणि वेदनादायी असल्याचं मत मांडलं होतं. सिव्हिल रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणं अपेक्षित असतं. पण, इथे मात्र परिस्थिती ही एखाद्या अंधारकोठडी किंवा त्याहूनही वाईट स्तरावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. दुर्दैवानं गरिब आणि निराधारांकडे कोणताही पर्याय नसल्यामुळं त्यांना यावरच अवलंबून राहावं लागतं, असा सूर न्यायालयाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात आळवण्यात आला होता. राज्यातील कोरोना नियंत्रणासोबतच रुग्णांना उपचार मिळण्याविषयीची जनहित याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणी करतेवेळी न्यायालयाकडून राज्यातील परिस्थितीची तुलना ही बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशी करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित न्यायाधीशांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

 

News English Summary: In the case of Corona, the Mahavikas Aghadi Chief Minister Thackeray government is doing a good job. Only politics is being carried out by the opposition. The Maharashtra government is not hiding figures about Corona. However, the BJP ruled Gujarat government is hiding the figures about Corona, a direct allegation made by NCP’s young MLA Rohit Pawar.

News English Title: Corona not Maharashtra but from the Gujarat government conceal NCP MLA Rohit Pawar News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x