9 May 2025 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON 7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली
x

बाळासाहेब ठाकरे किंव्हा राज ठाकरेंसारखा 'वक्ता' नसल्यानेच 'विशेष ट्रेनचे' ३४ प्रयत्नं ?

मुंबई : आज ६ एप्रिल म्हणजे भाजपचा वर्धापन दिन जो आज मुंबईमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत बांद्रा बीकेसीच्या भव्य मैदानावर पार पडणार आहे. विशेष म्हणजे ११ कोटी सदस्य संख्या आणि २० राज्यांमध्ये आमची सत्ता आहे असं सांगणारा, देशातील एक सर्वात मोठा पक्ष मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे. त्याला कारण सुद्धा तसंच आहे कारण लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आणि त्यामुळे पक्षानेही खर्चाच्या बाबतीत कोणतीच ‘विशेष’ कमी शिल्लक ठेवलेली दिसत नाही.

भाजपने बीकेसीतील सातही मैदाने सभेसाठी घेतली आहेत. त्यात ३ भव्य स्टेज, मुख्य व्यासपीठ, मंत्री – आमदार आणि खासदारांसाठी स्वतंत्र व्यासपीठ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ असे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य मैदानावर तीन लाख लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

परंतु इतके मोठे आयोजन करताना कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी असणे हे अनिवार्य ठरते. त्यामुळेच भाजपने ‘विशेष ३४ ट्रेन’ तसेच ‘प्रत्येक मतदार संघातून अंदाजे २०० कार’ आणि हजारो खासगी बसेसचे नियोजन करून कार्यकर्त्यांची गर्दी वाढविण्यासाठी ‘विशेष खर्च’ करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला पक्ष सभा, मेळावे आणि मिरवणूका ही काही नवी गोष्ट नाही. परंतु ती सभा जेंव्हा यशस्वी करण्याचा प्रश्न येतो तेंव्हा महत्वाचा विषय असतो तो सभेला संबोधित करणारा ‘वक्ता’. आपल्याला बोलताना जरी ‘वक्ता’ हा शब्द लहान वाटत असला तरी सभा ही ‘प्रचंड सभेत’ परिवर्तित करण्यासाठी ‘उत्तम वक्ता’ हाच महत्वाचा घटक असतो. कारण सभेला उपस्थित राहणारा कार्यकर्ता हा त्या ‘वक्त्याचे’ विचार ऐकण्यासाठीच येणार असतो.

उपस्थितांच्या मनाला भिडणारा आणि उत्कृष्ट भाषण शैलीतून कार्यकर्त्यांच्या मनाला स्पर्श करणारा ‘नैसर्गिक वक्ता’ ज्या पक्षाकडे असतो त्याला कोणत्याही ‘विशेष ३४ ट्रेन’ ‘हजारो कार’ आणि ‘हजारो खासगी आणि सरकारी बसेस’ ची गरज भासत नाही. कारण येणारा कार्यकर्ता हा आपल्या नेत्याचे तेच ‘मनाला भिडणारे’ विचार ऐकण्यासाठीच येणार असतो आणि तसा ‘मनाला भिडणारा वक्ता’ भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर कोणीही झालाच नाही. त्यामुळे विद्यमान नैतृत्वाला ३४ ट्रेनचे ‘विशेष’ प्रयत्नं करण्यावाचून दुसरा पर्यायच नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात उपस्थितांच्या मनाला भिडणारे ‘उत्तम वक्ते’ म्हणजे स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे हे एक मोठं नाव जे सर्वश्रुत आहे. त्यानंतर आजच्या घडीला तरी उपस्थितांच्या मनाला भिडणारे आणि कार्यकर्त्यांच्या मनाला साद घालणारा वक्ता म्हणजे मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे, ज्यांना प्रचंड सभा घेण्यासाठी कधीच ३४ ट्रेनचे ‘विशेष’ प्रयत्नं करावे लागले नाही.

सध्या समाज माध्यमांवर भाजपने या सभेसाठी केलेल्या तुफान खर्चाची चर्चा रंगलेली दिसत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या