TikTok देशभक्त, चिनी कंपनीच्या लेटेस्ट मोबाइलला तुफान प्रतिसाद

मुंबई, १९ जून: भारत-चीन दरम्यान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी विविध स्तरावर होत आहे. सोशल मीडियावर अशा आशयाचं आवाहन केलं जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र उलट चित्र दिसून येतंय. चिनी कंपनी वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनसाठी काल (दि.18) भारतात सेल आयोजित करण्यात आला होता. अॅपल आयफोनच्या तोडीची किंमत असलेल्या या फोनला भारतीय ग्राहकांचा मात्र शानदार प्रतिसाद मिळाला आणि हा सेल सुरू झाल्यानंतर हा फोन काही मिनिटांमध्येच ‘सोल्ड आउट’ झाल्याचं समोर आलं आहे.
काल (दि.18) वन प्लस 8 प्रो 5G या फोनसाठी अॅमझॉन आणि वन प्लसच्या अधिकृत संकेतस्थळावर खास सेल आयोजित करण्यात आला होता. दुपारी 12 वाजता सेलला सुरूवात झाली, पण अॅमझॉनच्या वेबसाइटवर काही मिनिटांमध्येच हा फोन सोल्ड आउट झाला. सेलमध्ये OnePlus 8 Pro 5G खरेदी करणाऱ्यांसाठी काही ऑफरही होत्या. एसबीआयच्या कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 3,000 रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळत होते. याशिवाय जिओच्या ग्राहकांना 6,000 रुपयांपर्यंतच्या जिओ बेनिफिट्सची ऑफर होती.
तसेच ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देण्यात आला होता. एकीकडे चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असताना हा चिनी फोन सेलमध्ये काही मिनिटांतच विकला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
लवकरच Oppo Find X2 सीरीज भारतात लॉन्च होणार आहे. कंपनी या सीरीजचे दोन स्मार्टफोन Oppo Find X2 आणि Oppo Find X2 Pro लॉन्च करणार आहे. भारताआधी हे दोन्ही स्मार्टफोन युरोपमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. 17 जून रोजी दुपारी 4 वाजता ओप्पोच्या या दोन्ही सीरीजचं लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे लॉन्चिंग होणार आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग कंपनीच्या यूट्यूब चॅनेल आणि Oppo Mobiles Indiaच्या सोशल मीडियावरुन पाहता येऊ शकतं.
Oppo Find X2 सीरीज 120Hz अल्ट्रा व्हर्जन डिस्प्ले आणि पंच होल डिस्पले डिजाइनसह लॉन्च होणार आहे. Oppo Find X2 Pro या सीरीजचं सर्वात प्रीमियम मॉडेल आहे, जो 10x हाइब्रिड झूम आणि 60x डिजिटल झूमसह लॉन्च करण्यात येणार आहे. भारतात Oppo Find X2च्या 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 60 हजार ते 65 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
News English Summary: A sale for the latest ‘One Plus 8 Pro’ smartphone from Chinese company One Plus was held in India yesterday (Dec. 18). However, the phone, which is priced at the same as the Apple iPhone, received a great response from Indian consumers, and the phone was sold out within minutes of the sale.
News English Title: One Plus 8 Pro smartphone got great response from Indian consumers and the phone was sold out within minutes of the sale News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA