मुंबई, 19 जून: शिवसेना पक्ष प्रमुख आणि महराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या चीन संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी चीनबाबत राग व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत शांत आहे. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा होत नाही. भारत मजबूत आहे, मजबूर नाही. आमच्यात डोळे काढून हातात देण्याची क्षमता आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी चीनला इशारा दिला.

आम्ही सगळे एक आहोत, हीच भावना आहे. आम्ही पंतप्रधान मोदींसोबत, आमच्या सैन्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. आपल्या सरकारमध्ये डोळे काढून हातात द्यायची ताकद आहे,’ असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केलं.

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला 20 राजकीय पक्षांना निमंत्रण होतं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांनी आपण सरकारसोबत असून, महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

 

News English Summary: Shiv Sena chief and Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Friday attended an all-party meeting on China convened by Prime Minister Narendra Modi. In the meeting, Uddhav Thackeray expressed his anger about China. “India is calm,” he said. This does not mean that we are weak. India is strong, not compelled.

News English Title: Our Government Has The Ability To Aankhien Nikalkar Haath Me De Dena Says Cm Uddhav Thackeray In All Party Meet News latest Updates.

मोदीजी…भारत मजबूत आहे, मजबूर नाही; डोळे काढून हातात देऊ – उद्धव ठाकरे