6 May 2024 11:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे - फडणवीस

Fadnavis, CM Uddhav Thackeray, Corona Virus

मुंबई, २० जून : कोरोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे, असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असून, त्यात राज्यातील एकूण स्थिती मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिली आहे. विशेषतः फडणवीस यांनी मुंबईतील वाढत्या मृत्यूदराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

या पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. १९ जूनला राज्यात आत्तापर्यंतचे सर्वाधित ३८२७ रुग्ण तर सर्वाधित ११४ मृत्यू नोंदले गेले. राज्यातल्या एकूण रुग्णांपैकी ५२.१८ टक्के रुग्ण एकट्या मुंबईचे आहेत. जून महिन्याच्या १८ दिवसांमध्येच ४३.८६ टक्के रुग्ण वाढले आहेत. मुंबईत हेच प्रमाण ३६.८८ इतकं आहे. हे सगळं घडत असताना अजूनही मुंबईत कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची आकडेवारी लपवली जात आहे. त्यामुळे ती पारदर्शीपणे लोकांसमोर मांडली जायला हवी’.

“आणखी एका गंभीर विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. मुंबईतील केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुमारे १० रुग्णांचा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. करोनाच्या काळात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रांची निगा राखणे अतिशय आवश्यक आहे. यापूर्वीसुद्धा मे महिन्यात जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात १२ जणांना ऑक्सिजनच्या यंत्रणेतील बिघाडामुळे प्राणास मुकावे लागले. हे आरोग्य यंत्रणेतील गंभीर दोष दाखवितात. आपण स्वतः या सर्व प्रकारांत लक्ष घालावे आणि हे दोष दूर करावेत”, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has drawn the attention of Chief Minister Uddhav Thackeray by saying that the situation in Mumbai and Maharashtra is deteriorating day by day due to Corona. Fadnavis has given a letter to the Chief Minister in which the overall situation in the state has been brought to the notice of the Chief Minister.

News English Title: Fadnavis has given a letter to the Chief Minister in which the overall situation in the state over corona virus crisis News Latest updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x