रत्नागिरी : नाणार प्रकल्पाच्या मुद्याला हात घालून राज ठाकरे यांनी नाणार दौरा सुद्धा केला होता. त्याचाच प्रत्यय म्हणजे मनसेने कोकणात सुद्धा पाय पसरायला सुरुवात केली आहे.
मनसेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपंचायतीच नगराध्यक्ष पद आधीच आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नैतृत्वाखाली मनसेने कोकणात पक्षाचा पसारा वाढवायला सुरुवात केली आहे. कोकणात मनसेचा एक मोठा चाहता वर्ग आहे आणि जर भविष्यात राज ठाकरे यांनी खेडच्या विधानसभेवर विशेष लक्ष दिल्यास ही जागा त्यांच्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोकणात पक्ष वाढीसाठी मनसेचे जोरदार प्रयत्नं चालू झाले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणित झाला आहे. मनसेचे सरचिटणीस कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ.मनोज चव्हाण आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत पक्ष वाढीसाठी विशेष प्रयत्नं केले जात आहेत त्याचाच हा प्रत्यय असल्याचे म्हटले जात आहे.
