3 May 2025 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

कोणाच्याही बाजूने, कधी विरोधात काहीही लिहितात, सामनाला स्वत:चा बेस नाही - फडणवीस

Opposition Devendra Fadnavis, Saamana Editorial, Shiv Sena

मुंबई, ८ जुलै : ‘सामना’इतका अंतर्विरोध कुठेच पाहिला नाही. ‘सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवार साहेबांच्या विरोधात असते, तर कधी बाजूने. त्यांना स्वतःचा बेसच नाही, अशी बोचरी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

‘सामना’ची भूमिका रोज बदलते, ती कधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात असते, कधी बाजूने असते. कधी राज्यपालांच्या बाजूने असते, तर कधी विरोधात असते. त्यांना स्वतःचा बेसच नाही. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या ‘सामना’ची काय अवस्था आहे. भूमिका नसलेला सामना, लांगुलचालन करणारा सामना, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

याबाबत टीव्ही ९ शी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामनानं कधी पवारांविरोधात लिहिलं कधी बाजूने लिहिलं, राज्यपालांविरोधात लिहिलं परत बाजूने लिहिलं, सातत्याने भूमिका बदलत असतात. सामनाला स्वत:चा बेस नाही, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातल्या ‘सामना’ची आज काय अवस्था झाली आहे. भूमिका नसणारा सामना, लांगूनचालन करणारा सामना, त्यावर काय प्रतिक्रिया देणार? त्यांना काय लिहियाचं ते त्यांचे त्यांना लखलाभ आहे असा टोला शिवसेनेला लगावला.

तसेच आम्ही सरकार पाडण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. सरकार पाडण्याची घाई नाही असं वारंवार आम्ही सांगतोय पण चोराच्या मनात चांदणे, म्हणून त्यांना रोज सरकार पडणार नाही असं सांगावे लागत आहे. त्यांच्या अंतर्विरोधामुळे हे सरकार एकरुप नाही असं समाज मनाची अवस्था आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: I have never seen such a contradiction in a match. The role of ‘Saamana’ changes every day, sometimes against Pawar Saheb, sometimes on his side. Opposition leader Devendra Fadnavis has criticized him for not having his own base.

News English Title: Opposition Devendra Fadnavis reaction on Samana Editorial over Shiv Sena target Opposition News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या