3 May 2024 7:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

धारावीत RSS च्या स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, चित्रा वाघ यांनी फोटो शेअर केले

BJP leader Chitra Wagh, RSS, Dharavi

मुंबई, १२ जुलै : धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचे कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टीवर टीका करायची नाही का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी ‘धारावी’ कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण या धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण याचं श्रेय सरकारचं नसून राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी धारावीतील कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र सरकारमुळे नाहीतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आल्याचं भाजपच्या नितेश राणे यांनी म्हटलं होतं.

आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह माहिती देताना, राष्ट्रीय स्वयंसेवस संघाच्या 800 स्वयंसेवकांच्या अविरत कार्यामुळेच धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचे त्यांनी म्हटलंय. तसेच, RSS स्वयंसेवकांनी लक्षणीय काम केलं असून धारावीतील लोकांना कोरोनाबद्दल जागृत करणं, अन्नधान्य पुरवणं, यांसारखी महत्वाची कामे केली आहे. या कामादरम्यान काहींना कोरोनाची लागणही झाल्याचे वाघ यांनी नमूद केले आहे.

 

News English Summary: BJP leader Chitra Wagh shared some photos from her Twitter account. Giving information with these photos, he said that the corona in Dharavi came under control due to the relentless work of 800 volunteers of the Rashtriya Swayamsevak Sangh.

News English Title: BJP leader Chitra Wagh shared some photos from her Twitter account News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x