5 May 2024 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

ऑपरेशन लोटस याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे सत्तेचा गैरवापर - शरद पवार

Prime Minister Narendra Modi, Sharad Pawar, OPeration Lotus

मुंबई, १३ जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर हा सरळसरळ होतो आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ज्यावेळी मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तसंच काही राज्यांची सत्ता भाजपाकडे होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी कधीही सूडबुद्धीचं धोरण भाजपाशासित राज्यांच्या बाबतीत स्वीकारलं नाही.

त्या काळात ज्यावेळी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत बैठक असे त्यावेळी भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दोन दिवस आधी होत असे. त्या बैठकीत देशाच्या पंतप्रधानांबाबत अत्यंत कठोर शब्दात नरेंद्र मोदी टीका करत असत. याआधी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री इतक्या कठोर शब्दांत पंतप्रधानांवर टीका करतो हे आम्ही पाहिलं नव्हतं. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय.

शरद पवार म्हणाले की, ‘’ऑपरेशन लोटस याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे सत्तेचा गैरवापर करून लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणे, अस्थिर करणं आणि त्यासाठी केंद्रातील सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणे होय.’’

राज्यात ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन लोटस राबवलं जाईल, असं सांगण्यात येत आहे, असा सवाल विचारला असता त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, पहिल्यांदा तीन महिन्यात ऑपरेशन लोटस राबवले जाईल असे सांगत होते. त्यानंतर आता सहा महिने झाले. त्यानंतर सप्टेंबर महिना सांगितला जात आहे. तर काही जण ऑक्टोबरमध्ये ऑपरेशन लोटस राबवले जाईल, असं म्हणताहेत. मात्र मला खात्री आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे उत्तम रीतीने राज्याचा कारभार करेल. तसेच ऑपरेशन लोटस असो किंवा आणखी काय? त्याचा या सरकावर काहीही परिणाम होणार नाही.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi is doing politics of revenge. Not only that, but NCP President Sharad Pawar has accused them of misusing their power.

News English Title:  Prime Minister Narendra Modi Does Politics Of Revenge Says Sharad Pawar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x