3 May 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

गुगल आणि जिओ मिळून अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार

RIL AGM 2020, reliance industries Mukesh Ambani, Android Smart phone, Google

मुंबई, 15 जुलै : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक, इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल असे 4 मोठे भागीदार असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली.

गुगलने एकूण 33,737 कोटी रुपये JIO प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणार असल्याचं मान्य केलं आहे, असं अंबानी म्हणाले. त्यांची ही गुंतवणूक फक्त आर्थिकच नव्हे तर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट असेल. Facebook, Intel, Qualcomm आणि Google या 4 मोठ्या भागिदारांखेरीज एकूण 14 गुंतवणूकदार जिओमध्ये असतील. त्यातले 6 तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातले गुंतवणूकदार आहेत तर 3 sovereign funds आहेत. अशा 14 गुंतवणूकदारांसह Jio ने 1,52,056 कोटींचा निधी उभा केला आहे, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.

दरम्यान, गुगलबरोबर मिळून 4जी- 5जी स्मार्टफोन बनवणार असल्याचंही रिलायन्सनं जाहीर केलं आहे. हे स्मार्टफोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असतील. मुकेश अंबानी म्हणाले की, आतापर्यंत १० कोटींहून अधिक लाइव्ह फोनची विक्री झाली आहे. परंतु तरीही फीचर फोन युजर्स स्मार्टफोन येण्याची वाट पाहत आहेत. आमचा विश्वास आहे की आम्ही एन्ट्री लेव्हलला 4जी आणि 5जी स्मार्टफोन बनवू शकतो. आम्ही असा फोन डिझाइन करू शकतो, ज्याची किंमत सामान्य स्मार्टफोनपेक्षा कमी असेल. तसेच गुगल आणि जिओ मिळून एक व्हॅल्यू इंजिनियर्ड अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: Jio can design a phone that will cost less than a normal smartphone. He also said that Google and Jio will jointly build a value-engineered Android-based smartphone operating system said Mukesh Ambani.

News English Title: RIL AGM 2020 reliance industries Mukesh Ambani announced android based smart phone with google help News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x