3 May 2025 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

नालासोपारा स्थानकात ट्रॅकवर उतरून प्रवाशांचा हंगामा, लोकलमधून प्रवासाची मागणी

Coronavirus, Lockdown, Commuters Protest, nalasopara

नालासोपारा, २२ जुलै : आम्हाला लोकलमधून प्रवास करू द्या’, अशी मागणी करत आज नालासोपारा रेल्वे स्थानकात सर्वसामान्य प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रवाशांचा संताप अनावर झाल्याचे दिसून आले. प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून मोठा हंगामा केला होता. दरम्यान, या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकात मोठी गर्दी निर्माण झाली होती. बससेवेत अडचणी निर्माण होतात, आमचा विचार करा, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही लोकलमधून प्रवास करू द्या, अशी मागणी यावेळी प्रवाशांकडून करण्यात आली.

नालासोपारा येथील लोक सकाळी एसटी स्टँडवर पोहोचले असता सेवा बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांचा संताप झाला आणि त्यांनी थेट रेल्वे स्टेशन गाठलं. पोलिसांनी यावेळी परिस्थितीवर नियंत्र मिळवण्याचा प्रयत्न केला. पण प्रवाशांनी आपल्यालाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत रेल्वे ट्रॅकवर उतरले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. अखेर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

 

News English Summary: A large crowd of ordinary passengers had gathered at Nalasopara railway station today demanding that we be allowed to travel by local. At this time, the anger of the passengers was seen to be unleashed. Passengers had a big harvest off the track.

News English Title: Coronavirus Lockdown Commuters Protest Demanding Permission To Travel In Local News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या