3 May 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात ईडी'ची उडी..केंद्र तपास स्वतःकडे घेऊ इच्छितंय?

Enforcement Directorate, jump into, Sushant Singh Rajput, Suicide case

नवी दिल्ली, ३० जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. १४ जून रोजी सुशांत सिंहने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. सुशांत सिंहने टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकं काय कारण होतं याचा मुंबई पोलीस तपास करत आहे. याप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान वारंवार याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत याचिका फेटाळली आहे.

सध्या पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांना त्यांचं काम करू द्या, असं सुप्रीम कोर्टाने अलका प्रिया यांच्या याचिकेवर भाष्य करताना म्हटलं. या प्रकरणाशी अलका यांचा थेट असा कोणताही संबंध नाही. त्यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जावं, अशी सूचना न्यायालयानं केली. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मात्र आता याप्रकरणात ईडीने उडी घेतल्याने अनेक तर्कवितर्क सुरु झाले असून, केंद्र सरकार हे हाय प्रोफाइल प्रकरण स्वतःकडे तर घेऊ इच्छित नाही ना अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. कारण ईडीने सदर प्रकरणी मुंबई पोलिसांशी पत्र व्यवहार न करता बिहार पोलिसांशी संपर्क करून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील FIR ची प्रत मागितली आहे.

 

News English Summary: Enforcement Directorate writes to Bihar police seeking copy of FIR filed in death case of Sushant Singh Rajput; may file PMLA case news latest updates.

News English Title: Enforcement Directorate jump into Sushant Singh Rajput suicide case News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x