2 May 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
x

अर्णब गोस्वामीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट LIVE चर्चेत बघून घेण्याची धमकी

Arnab Goswami, CM Uddhav Thackeray, Sushant Singh Rajput

मुंबई, १ जुलै : अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुशांतच्या वडिलांकडून रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेली रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे. रियाच्या वकिलांकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये रिया सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करत आहे.

एकाबाजूला छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत अनेकांचा जबाब नोंदवला गेला आहे. याच दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सोपवावे. कोणीही या प्रकरणाचं राजकारण करू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. “जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे सोपवावे. आम्ही दोषींची चौकशी करून त्यांना शिक्षा करू. मात्र या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांदरम्यान वाद उत्पन्न करण्यासासाठी करू नका” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत असताना विवादित संपादक अर्णब गोस्वामीने त्याच्या चॅनेलवरून याच विषयाच्या चर्चेवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लख करत थेट धमकीच दिली आहे. पुढच्या चर्चेत बघून घेतो अशी थेट धमकीच अर्नबने एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली आहे. अर्णब गोस्वामीने पत्रकारितेच्या सर्व सीमारेषा ओलांडल्या असून, तो स्वतःचा चॅनल केवळ विशिष्ठ लोकांच्या इशाऱ्यावर चालवत असल्याचा थेट आरोप यापूर्वी करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांचं समर्थन असल्याने अर्णबने पत्रकारितेतील अत्यंत खालची पातळी गाठल्याचा आरोप सात्यत्याने होऊ लागले आहेत.

 

News English Summary: Controversial editor Arnab Goswami has made a direct threat to Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on his channel while discussing the issue on his channel. Arnab has given a direct threat to the Chief Minister of a state that he will look into the next discussion.

News English Title: Arnab Goswami on CM Uddhav Thackeray over Sushant Singh Rajput News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x