28 April 2024 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा
x

VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित, नव्या स्पॉन्सरशिपसाठी Jio कंपनी पुढे येऊ शकते

Official BCCI, Vivo Suspend, IPL Title Sponsorship, IPL 2020

मुंबई, ६ ऑगस्ट : १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगासाठी बीसीसीआयने VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार मोडला आहे. यासंदर्भात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक जाहीर करत माहिती दिली आहे. २०१८ साली बीसीसीआय आणि VIVO कंपनीचा ५ वर्षांचा करार झाला होता. आयपीएल स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपसाठी VIVO ने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती.

“गव्हर्निंग काऊन्सीलच्या बैठकीनंतर आम्ही आणि VIVO च्या अधिकाऱ्यांनी वेगळी चर्चा केली. या चर्चेअंती एक वर्षासाठी VIVO आयपीएलला स्पॉन्सर करणार नाही हे ठरवण्यात आलंय. दोन्ही बाजूंनी सामोपचाराने यावर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. या वर्षाच्या मोबदल्यात VIVO कंपनीसोबतचा करार २०२३ पर्यंत वाढवता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करणार आहे.” बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली.

दुसरीकडे, आयपीएलच्या प्रायोजत्वासाठी बीसीसीआयची रिलायन्सच्या जिओ या कंपनीबरोबर बोलणी सुरु असल्याचे ऐकिवात आहे. आयपीएलला जर कोणीही प्रायजोकत्व एवढ्या लवकर देत नसेल तर रिलायन्सची जिओ ही कंपनी पुढे येऊ शकते, असेही म्हटले जात आहे. कारण जिओने आपल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. त्याचबरोबर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना आयपीएलच्या प्रायोजकत्वाचा फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. रिलायन्स ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे. त्याचबरोबर मुकेश यांची पत्नी नीता यांचा मालकीचा मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे परस्पर हितसंबंध यामुळे जपले जाणार की नाही, हे तपासून पाहावे लागणार आहे.

 

News English Summary: The BCCI has terminated its contract with Chinese mobile company VIVO for the thirteenth season of the IPL, which will be played in the UAE from September 19 to November 10. The IPL Governing Council has issued a circular in this regard.

News English Title: Official BCCI Vivo Suspend IPL Title Sponsorship Ties For 2020 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x