3 May 2025 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

भाजपासंबंधित पोस्ट आणि त्या भूमिकेवरून फेसबुक'कडून अखेर खुलासा

Facebook, Clarify His Stand, Wall Street Journal Report, India

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट : कोरोना विषाणू, चीनची घुसखोरी, देशाची अर्थव्यवस्था यावरून घणाघाती सवाल करून काँग्रेस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मोदी सरकारची कोंडी केली होती. दरम्यान, राहुल गांधी यांनी काल भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अजून एक सनसनाटी आरोप केला होता. भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नियंत्रण मिळवले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्रातील लेखाचा संदर्भ देऊन केला होता.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट करून भाजपा आणि संघावर हा सनसनाटी आरोप केला होता. त्यात राहुल गांधी म्हणाले की, भारतात फेसबूक आणि व्हॉट्अ‍ॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे. त्या माध्यमातून ते फेक न्यूज आणि द्वेष पसरवत आहेत. तसेच निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठीही त्याचा वापर त्यांच्याकडून होतो. अखेरीस अमेरिकन प्रसारमाध्यमामधून फेसबूकबाबतचे सत्य समोर आले, असा दावा त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रातील लेखाच्या हवाल्याने केला होता.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने ‘फेसबुक हेट स्पीच रूल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर अखेर फेसबुकनं खुलासा केला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनं आपल्या वृत्तात असं म्हटलं होतं की, “फेसबुक-इंडियाने भाजप नेत्यांची प्रक्षोभक भाषणे आणि आक्षेपार्ह मजकूर नियमांनुसार काढून टाकले नाहीत. फेसबुकसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून सत्ताधारी पक्षाला दुखावल्यास कंपनीच्या व्यावसायिक हितावर विपरित परिणाम होईल, या भीतीपोटी भाजपनेत्यांचा विद्वेषीमजकूर आणि भाषणांकडे दुर्लक्ष केले.”

दरम्यान, या वादावर फेसबुकच्या प्रवक्त्यांनी खुलासा केला आहे. “कोणचंही राजकीय वजन वा पक्षांशी संबंधाचा विचार न करता आम्ही हिंसेला चिथावणी देणारी द्वेषयुक्त भाषण आणि लिखाणाला प्रतिबंधित करतो. हेच धोरण जागतिक पातळीवर अमलात आणतो. अचूकता व चांगुलपणा यांची निश्चितता करण्यासाठी आम्ही या अमलबजावणीसंदर्भात प्रगतीवर आहोत आणि या प्रक्रियेची नियमितपणे आढावा घेत आहोत,” असं फेसबुकच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: THE Parliamentary Standing Committee on Information Technology will look into the report in The Wall Street Journal that Facebook’s top public policy executive in India, citing business reasons, didn’t apply “hate-speech rules” to at least four individuals and groups linked with the BJP who were “flagged internally for promoting or participating in violence”.

News English Title: Facebook Clarify His Stand On Wall Street Journal Report About India News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या