28 April 2024 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

मोदी जे कधीच मान्य करत नाहीत ते 'अटल बिहारी वाजपेयीनीं' मान्य केलं होतं: व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ पासून काँग्रेसवर टीका करताना प्रत्येक भाषणात देशवासियांना एक विषय वारंवार ऐकवतात आणि तो म्हणजे या देशात ७० वर्षात देशात काहीच विकासाची कामं झाली नाहीत. काँग्रेसवर टीका करताना त्यांचा नेहमीच हा दावा असतो.

त्यांची टीका एवढ्यावरच थांबत नाही तर मोदी सरकारमध्ये अनेक नेते असं जाहीरपणे बोलू लागले आहेत की, काँग्रेसने जो विकास ७० वर्षात केला नाही तो आम्ही केवळ ४ वर्षात केला. एकूणच सध्या भाजपचे नेते उपभोगत असलेल्या सर्व सुविधा ह्या काँग्रेसच्या काळातीलच आहेत याची सुद्धा त्यांना जाणीव नाही.

परंतु एनडीएचे आणि भाजपचे आधीचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी मात्र त्याच्या कार्यकाळात असं कधीही म्हणाले नाहीत की, काँग्रेसच्या राजवटीत ५० वर्षात देशात काहीच प्रगती झाली नाही. इतकच नाही तर ते पुढे असं सुद्धा मान्य करतात की, वस्तुस्तिथी न स्वीकारणे म्हणजे देशाच्या पुरुषार्थावर पाणी फिरविण्यासारख आहे. काँग्रेसने ५० वर्षात काहीच केलं नाही असं बोलणं म्हणजे शेतकऱ्यांवर, कामगारांवर आणि सामान्य भारतीयांवर अन्याय करण्यासारखं होईल असं ते प्रामाणिक पणे भर लोकसभेत मान्य करायचे.

भाजपच्याच दोन पंतप्रधानांच्या स्वभावातील आणि व्यक्तिमत्वातील प्रामाणिकपणा दाखवणारा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे.

काय म्हणाले होते अटल बिहारी वाजपेयी लोकसभेत, पहा सविस्तर

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x