मुंबई, ९ सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा शिवसेनेबरोबर वाद सुरु आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबरोबर तिचं वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. कंगनाने मुंबईची तुलना थेट POK शी केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. कंगना आज मुंबईत दाखल होत आहे. पण त्याआधीच कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेकडून हातोड चालवला जात आहे.
कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, कंगनाच्या वकिलांकडून कारवाईला आक्षेप घेण्यात आला. पालिकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हणत त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर झालेल्या सुनावणीत कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. कंगणा राणौतसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
Bombay Hight Court asks BMC to stop demolition work at Kangana Ranaut’s bungalow in Mumbai
— Press Trust of India (@PTI_News) September 9, 2020
News English Summary: The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) on Wednesday demolished “illegal alterations” at the Bandra office of Bollywood actor Kangana Ranaut ahead of her arrival in Mumbai. Following the BMC action, Kangana Ranaut’s lawyer moved the Bombay High Court. The HC has stayed the demolition process.
News English Title: Mumbai High Court stays BMC demolition at Kangana Ranauts property Marathi News LIVE latest updates.
