Power Cut | प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, १२ ऑक्टोबर : मुंबई आणि परिसरात सोमवारी अचानक वीज पुरवढा खंडीत झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर अडीच ते तीन तासांनी वीज पुरवढा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. राज्यात कोरोनाचं संकट असल्याने हॉस्पिटल्समधल्या वीज पुरवढ्याबाबत प्रशासन चिंतेत होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिलेत.
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश या आधीच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी उर्जा विभागाचं टेक्निकल ऑडिट करण्याचेही आदेश आजच्या बैठकीत दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्या प्रकरणी काही बेजबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. वीज पुरवठा खंडीत झालेल्या तीनही वाहिन्या तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. असा प्रकार पुन्हा घडू नये याचीही काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.
मुंबईमध्ये आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
News English Summary: Large power cuts such as the one that hit Mumbai and neighboring areas on Monday (October 12) morning can be dangerous events for those affected. In addition to inconveniencing households and those trying to use public transport, vital hospital systems, students’ exams and court hearings were impacted in Mumbai following a failure of the power supply grid. On Monday morning around 50 lakh homes and operational business around Mumbai suffered power cuts.
News English Title: Power Cut Case To Be Fully Investigated Says CM Uddhav Thackeray Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL