29 April 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

राष्ट्रवादी भाजपाला दोन राजकीय धक्के देणार | पहिला एकनाथ खडसे | आणि दुसरा...

BJP leader Eknath Khadse, Rohini Khadse, Join NCP

जळगाव, २० ऑक्टोबर : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. इतकचं नाही तर खडसेंनी २ दिवसांपूर्वी भाजपाच्या अधिकृत सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येऊ लागल्या आहेत, खुद्द एकनाथ खडसेंनी यावर मौन बाळगलं असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होते.

मात्र एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खासदार शरद पवारांनी संकेत दिले आहेत, पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं त्यांनी सांगितलं आहे. पक्ष सोडलेल्यांना परत घेण्याबाबत शरद पवारांनी गेलेत तिथे सुखी राहा असा संदेश दिला होता.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. फक्त एकनाथ खडसेच नाहीतर त्यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या जाण्यामुळे भाजपला धक्का बसणार आहे हे निश्चित आहे. पण खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देणार आहे.

 

News English Summary: There was talk that senior BJP leader Eknath Khadse would soon join the NCP. But, finally, the date of Eknath Khadse’s entry into NCP has been fixed. Not only Eknath Khadse but also his daughter Rohini Khadse will join NCP.

News English Title: BJP leader Eknath Khadse and Rohini Khadse will join the NCP on October 22 at Mumbai News Updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x