5 May 2024 1:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पालघर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना बुलेट-ट्रेनच्या विरोधात ?

पालघर : सध्या पालघर जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीची लगबग असून त्याचाच मेळ साधून शिवसेनेने बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे. पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सूचित केले आहे. बुलेट ट्रेनला विरोध असण्यापेक्षा या मागील खरं कारण लोकसभा पोटनिवडणुक असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जून महिन्यात ३ तारखेला पालघरमध्ये मोर्चाचे कृती समितीने आयोजन केलं असून त्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या आधीच पाठिंबा जाहीर केला असून जमीन अधिग्रहण लढ्यात सुद्धा मनसे स्थानिक शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष आक्रमक झाली आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून सरकारचे जमीन मोजणीचे काम उधळून लावले आहे. परंतु शिवसेना पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर या विरोधात उतरल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते शिवसेना केवळ पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर या विरोधात उतरली असून त्याचा खरा उद्देश भाजपला पोटनिवडणुकीत कोंडीत पकडणे हाच असल्याचे म्हटले जात आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x