18 May 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

हे प्रकरण अतिशय गंभीर | अशा प्रकारे जामीन देता येणार नाही - उच्च न्यायालय

Republic TV editor, Arnab Goswami, Bombay High Court, Rejects Interim Bail

मुंबई, ९ नोव्हेंबर: वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टातही गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टाने त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले.

अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने FIR रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी हायकोर्टात अर्ज करण्यात आला होता. ३ दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णव यांना जामीन देण्यास नकार दिला. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले. या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ हायकोर्टात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असं मत देखील न्यायालयाने व्यक्त केलं. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, अर्णब यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला आहे. तसेच, सीआरपीसी 349 अंतर्गत त्यांना विनंती अर्ज करता येऊ शकतो, असे मत कोर्टाने नोंदवले आहे. तर, सत्र न्यायालयात अर्णब यांना जामीन करण्याची मुभा देण्यात आली असून सत्र न्यायालयात चार दिवसांत यावर निकाल देता येईल, असेही कोर्टाने म्हटले आहे. अर्णब यांच्या तत्काळ जामीन अर्जाला नकार दिल्यामुळे अर्णब यांना अजून काही दिवस कारागृहातच राहावे लागणार आहे, अंदाज आहे. आता, सत्र न्यायालयात अर्णब यांनी जामीन अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जावर सुनावणी होईल.

 

News English Summary: Arnab Goswami, editor-in-chief of Republic News Channel, who was arrested in connection with the suicide of architect Naik, had moved the Mumbai High Court. However, Goswami was not relieved even in the High Court. His application for interim bail was rejected by the Mumbai High Court. He also ordered Goswami to go to the lower court.

News English Title: Republic TV editor Arnab Goswami arrest Bombay High Court Rejects Interim Bail News Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x