3 May 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा | कराचीचं नंतर बघू | फडणवीसांना टोला

First bring, PoK in India, Shivsena, Devendra Fadnavis

मुंबई, २३ नोव्हेंबर: ‘कराची स्वीट्स’ (Karachi Sweets) या दुकानाच्या नामांतराची एका शिवसैनिकानं केलेली मागणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोला हाणला आहे.

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केलेल्या या मागणीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कराचीच एक दिवस भारतात असेल असं म्हटलं. त्यानंतर संजय राउत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. फडणवीसांवर टीका करताना राउत म्हणाले, “आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, कराचीच नंतर बघू”.

मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर ‘कराची स्वीट्स’ हे नाव बदला, अशी तंबी शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी अलीकडेच वांद्र्यातील एका दुकानमालकाला दिली होती. खासदार संजय राऊत यांनी तात्काळ पुढं येत ही मागणी चुकीची असल्याचं म्हटलं होतं. ‘निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही,’ असा खुलासा त्यांनी केला होता.

 

News English Summary: Reacting to the demand made by Shiv Sena leader Nitin Nandgaonkar, BJP leader Devendra Fadnavis said that Karachi would one day be in India. After that, Sanjay Raut had attacked Fadnavis. Criticizing Fadnavis, Raut said, “Bring Pakistan-occupied Kashmir to India first, let’s see Karachi later.”

News English Title: First bring PoK in India first lets see Karachi later Shivsena attacks Fadnavis News updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x